लहान मुलांसाठी औंध-बोपोडी भागात 33 बेडचं हॉस्पिटल होणार!
पुणे-बोपोडी येथील खेडेकर हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटल या दोन्ही इमारतींचे एकत्रीकरण करून संयुक्त व्यवस्थापना द्वारे लहान मुलांसाठी खाटा आणि सुसज्ज असे ऑक्सिजन बेड आरक्षित करून कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती येथे उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी माध्यमांना दिली .
अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि अधिकाऱ्यांनी यासाठी ३ कोटीची तरतूद करून संबधित रुगानालयीन व्यवस्था सुसज्ज केल्याचे त्यांनी म्हटले आहे .