पुणे- आज खासदार आणि एनसीपी च्या अर्बन सेल च्या प्रदेशाध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अर्बन सेलची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिक, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, सांगली, आदी शहरांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व अर्बन सेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. यांनंतर अर्बन सेलमार्फत दि. २०, २१ व २२ जुन २०२० रोजी विविध विषयांवर चर्चासत्र राबविण्यात येणार असून सदर चर्चासत्रात श्रीमती. मीरा बोरवणकर, श्री. संजय आवटे, श्रीमती. सुलक्षणा महाजन हे वक्ते सहभागी होणार आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केले.शहरामध्ये उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी आणि हॉस्पिटल, टेस्टिंग, क्वारंटाईन, ऍम्ब्युलन्स, इम्म्युनिटी, शासकीय यंत्रणा इ. सेवा. त्या सेवांसंदर्भात प्रशासनाकडून लोकांना माहिती पुरवण्याची यंत्रणा उपलब्ध करणे, शिवभोजनथाळी आणि धान्य उपलब्धता यासाठी आग्रही राहणे.घरात / कामाच्या ठिकाणी / तसेच सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी मास्क, सोशिअल डिस्टंसिन्ग, सानीटायझर / हात धुणे याबाबत जनजागृती करणे व लॉकडाऊन नंतर घ्यावयाची काळजी याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. महिलांवर वाढलेला कामांचा ताण, आर्थिक आणि मानसिक बोजा या अनुषंगाने समाजात घडवून आणायचे बदल, नवीन रोजगारांच्या विविध संधी कश्याप्रकारे उपलब्ध होऊ शकतात यांसाठी चर्चासत्र आयोजित करणे. शारिरीक व मानसिक स्वास्थ्य – आहार, योगा; यांसारखे उपक्रम राबविणे.जागतिक तापामानसंदर्भात घ्यावयाची पाऊले, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी गोष्टीत नागरिकांचा सहभाग वाढवणे. असे संकट पुन्हा येऊ नये या दृष्टीने विविध वयोगट व आर्थिकगट यांच्यामध्ये निसर्गाचे रक्षण करणेसंदर्भात विविध पातळीवर जनजागृती करणे.यावर चर्चा करून निर्देश दिले .सदर बैठकीस विद्या चव्हाण (आमदार व अर्बन सेल उपाध्यक्ष), सुरेश पाटील (उपाध्यक्ष – प्रदेश रा. कॉ.पा, अर्बन सेल)आदी उपस्थित होते.