माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हल उद्यापासून पुण्यात

Date:

पुणे-: माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आजपासून पुण्यात सुरु होत आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश आहे.  सोमवार, दि. 11 जानेवारी रोजी म्हात्रे पुलानजिक असलेल्या तेंडुलकर उद्यानाशेजारील इंद्रधनु हॉल येथे सकाळी ११.३० ते ४.०० यावेळेत पहायला मिळतील. तसेच यातील निवडक २० लघुपटाचे प्रक्षेपण व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वा. स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे होणार आहे. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, इन्व्हारमेंट क्लब ऑफ इंडियाचे निलेश इनामदार, लेखक व दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली. हे फेस्टिवल पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने, माय अर्थ फौंडेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

यावेळी एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीयाचे ललित राठी,  सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील यावेळी उपस्थित असणार आहेत.

हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी  संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या;ताथवडे-पुनावळेतील १६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात अद्यात...

‘शहरे बिल्डरांच्या सोयीने उभी करता, नागरिकांच्या गरजांचे काय?’; राज ठाकरेंचा अनियंत्रित शहरीकरणावर घणाघात!

पुणे–मुंबईतील वाहतूककोंडी, उंच इमारती, पार्किंगचा बोजवारा आणि नियोजनशून्य विकासावरून...

मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २६. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून...

पुण्याच्या जलव्यवस्थापनासाठी फिनलंडच्या प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेण्याच्या हालचाली!

महापौर मंजुषा नागपुरेंच्या पुढाकारातून पुणे–फिनलंड सहकार्याला चालना; सांडपाणी पुनर्वापर,...