Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर

Date:

प्रेमाला जात नसतेस्टार प्रवाहचेपुढचं पाऊल

स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्यापुढचं पाऊलया मालिकेने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात आवडीने पाहिली जात असल्याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर यांना कोल्हापूरमध्ये आलीया मालिकेतीलप्रेमाला जात नसतेहा नवा विचार मांडणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) यांच्यावर आधारित सुरु असलेल्या कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अक्कासाहेब यांनीप्रेमाला जात नसते आणि प्रेमाने जातीपातीची बंधने पुसून टाकता येतात‘, असे मत मांडले.
पारंपारिक कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर गेले सहा वर्षे यशस्वीरीत्या सुरु असलेल्या या मालिकेने नवे वळण घेतले आहे. आंतरजातीय प्रेम तसेच विवाहाला विरोध करणाऱ्या आपल्या समाजबहूल परिस्थितीला आव्हान देण्याचे काम अक्कासाहेब यात करताना दिसणार आहेत. याच मुद्द्यावर सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) या कलाकारांसोबत कोल्हापूरदौऱ्यात नुकत्याच येऊन गेलेल्या हर्षदा खानविलकर यांनीप्रेमया शब्दांची त्यांची असलेली व्याख्या स्पष्ट केली.
पालकांनी आपल्या मुलांच्या प्रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचार करायला हवा. वेळीच प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यात चुकीचा निर्णय घेतल्याचे शल्य राहणार नाही. असा सल्ला त्या सर्व पालकांना देतात. त्याचबरोबरसंसार करणे खूप कठीण गोष्ट असते, प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. त्यामुळे थोरामोठ्याचे म्हणणे ऐकाअशी तरुणांची कानउघाडणी देखील त्या करतात. ‘प्रेमजात पाहून होत नाही, त्यामुळे प्रेमाला जातीसाठी दुय्यम लेखू नका. आपला हा संदेश प्रसारमाध्यमांनी जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचवावा अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली. आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच आधुनिक विचारसरणीची कास धरण्याचा संदेश अक्कासाहेब या मालिकेद्वारे  देताना दिसत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा हा दृष्टीकोन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
एकूणचप्रेमाला जात नसतेहा विचार स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी .३० वाजता प्रसारित होणाऱ्यापुढचं पाऊलया मालिकेच्या माध्यमातून समाजात रुजवला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....