Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दगडूशेठ गणपतीचं यंदा पहाटे साडेचारला विसर्जन (व्हिडीओ)

Date:

पुणे- पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी लकडी पूल येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले. महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी श्रीमंतांची आरती करून त्यांच्या नयनरम्य मनोहारी रथाचे सारथ्य केले ..गोपाल चिंतल ,सुशील मेंगडे,उमेश गायकवाड आदी नगरसेवक यावेळी त्यांच्या समवेत होते .
… नेहमीपेक्षा यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास आधी सुरु झाली होती… दरवर्षी दगडूशेठ गणपतीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्रीचे दोन वाजतात… मात्र यंदा दगडूशेठच्या पुढे असलेल्या गणेश मंडळांना, ती मंडळे डीजे वापर करत असल्या कारणानं लक्ष्मी रस्त्यावर आले नसल्याचं दिसलं… त्यामुळे दगडूशेठ गणपतीचं यंदा त्यामानानं लवकर विसर्जन झालं…
तर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात  ढोल-ताशा पथकांचा, गणेशोत्सव मंडळांचा उत्साह कायम असल्याचं दिसून आलं.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शाही मिरवणूक सजवलेल्या रथामध्ये विराजमान बाप्पांची छबी टिपण्यासाठी पुणेकरांसह राज्यातील इतर भागातून आलेल्या भाविकांची गर्दी झाली होती. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या ‘श्री विश्वविनायक’ रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजवण्यात आला होता. मोती रंगाच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा होता. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले ५ कळस बसविण्यात आले होते. तसेच, २२५ आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले होते.

लक्ष्मी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे आकर्षक देखावे असलेले चित्ररथ आणि ढोलपथकांच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणुका पाहायला मिळाल्या. संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर अन्य सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडले. तेव्हा रस्त्यांवर आकर्षक रोषणाई केलेले चित्ररथ पाहायला मिळाले. पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या लोकांनी हे गणपती पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे चौका-चौकात गर्दी केली होती. आज सकाळपर्यंत ही लगबग सुरु होती.
पहा हा व्हिडीओ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...