पुणे, 10 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिने सातव्या मानांकित औरंगाबादच्या मृण्मयी जोशीचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित रुमा गायकवारीने रजिथा राजेशचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. क्वालिफायर प्रिशा शिंदेने श्रेया पठारेचे आव्हान 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले. आठव्या मानांकित नागपूरच्या सेजल भुतडाने आपली राज्य सहकारी कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. कर्नाटकाच्या तिसऱ्या मानांकित श्रीनिधी बालाजी हिने लकी लुझर ठरलेल्या देवांशी प्रभुदेसाईचा 6-4, 3-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित तेलंगणाच्या तरुण कोरवारने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटकाच्या आर्य कळंबेल्लाचा 6-4, 6-4 असा पराभव केला. सार्थ बनसोडेने आर्यन कोटस्थानेचा टायब्रेकमध्ये 6-3, 1-6, 7-6(1) असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.आर्य कळंबेल्ला(कर्नाटक)6-4, 6-4; सार्थ बनसोडे(महा)वि.वि.आर्यन कोटस्थाने(महा)6-3, 1-6, 7-6(1);निशित रहाणे(महा)वि.वि.साहिल तांबट(महा)7-6(3), 6-2; अर्णव पापरकर(महा)वि.वि.ओजस दबस(महा)6-4, 1-2 सामना सोडून दिला; अभिराम निलाखे(महा)वि.वि.प्रद्युम्न तोमर 2-6, 6-2, 6-4; तनिष्क जाधव(महा)वि.वि.प्रणव गाडगीळ(महा)7-6(5), 6-3; अजमीर शेख(महा)[3]वि.वि.मनन चितानिया(महा)6-1, 6-1;जय दिक्षित(महा)वि.वि.नमित मिश्रा(महा)6-2, 6-1;
मुली:
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.रजिथा राजेश 6-0, 6-0;प्रिशा शिंदे(महा)वि.वि.श्रेया पठारे(महा) 6-3, 6-1; प्रेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4]वि.वि.रितिका मोरे(महा)6-1, 6-1;आकृती सोनकुसरे(महा)वि.वि.मृण्मयी जोशी(महा)[7] 6-2, 6-1;
सेजल भुतडा(महा)[8]वि.वि.ऐश्वर्या जाधव(महा)6-3, 6-2;श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3]वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(महा)6-4, 3-6, 6-1;एन हर्षिनी(कर्नाटक)[6]वि.वि.डेन्सिया फर्नांडो 6-3, 6-3;आस्मि आडकर(महा)वि.वि.मेहक कपूर(महा)6-3, 6-1;
दुहेरी: मुले: पहिली फेरी: अजमीर शेख/साहिल तांबट[1] वि.वि.अर्जुन गोहड/अर्णव पापरकर 6-2, 7-6(4);सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.अर्जुन कीर्तने/अभिराम निलाखे 7-6(4), 6-0;पार्थ देवरुखकर/जय पवार[4] वि.वि.अनमोल नागपुरे/वेद ठाकूर 7-5, 6-3;अनिष रांजळकर/अर्जुन अभ्यंकर वि.वि.ईशान गोधभरले/नमित मिश्रा 6-3, 6-1;