Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवीन मराठीत शिवचरित्र प्रश्‍नमंजुषा स्पर्धा

Date:

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत पालक-शिक्षक व माता पालक संघाच्या वतीने शिवचरित्र प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत ‘बहिर्जी’ गटाने विजेतेपद मिळविले. मुरारबाजी, तानाजी, नेताजी गटांनी अनुक‘मे दोन ते चार क‘मांक मिळविले. या स्पर्धेत इयत्ता चौथीच्या १६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. गड-दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजममुंढे, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, मु‘याध्यापिका कल्पना वाघ, शिक्षक-पालक संघाचे प्रसाद सुपेकर, माता-पालक संघाच्या गौरी दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची आवड निर्माण व्हावी, शिवरायांच्या कर्तृत्वाचे पैलू माहीत व्हावेत या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे स्वरूप लेखी व तोंडी असे होते. सात गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली होती. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते.
किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या स्पर्धेतून इतिहास संशोधन करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल. असा विश्‍वास गोजममुंढे यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शिवस्तुती व पोवाडा सादर केला. स्पर्धेच्या ठिकाणी भगव्या पताका, आबदागिरी लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होते. संजय भंडारे व विभावरी भंडारे यांचे विशेष सहकार्य लाभले. मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांनी प्रास्ताविक, मृदुला दीक्षित व अश्‍विनी देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि अनिता धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....