रंगवैखरी स्पर्धेत फर्ग्युसनच्या ‘वारसदार’ ची बाजी
पुणे-मराठी भाषेच्या देदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देणार्या राज्य मराठी विकास संस्था आयोजित ‘रंगवैखरी पर्व-२’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा ‘वारसदार’ हा नाट्याविष्कार प्रथम क्रमाकाचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी या संघाला रू. १,५०,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकांकिका स्पर्धांच्या परंपरागत
साचेबद्धपणापेक्षा वेगळेपण असलेल्या आणि नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या कलांचा संगम साधून मराठी भाषेच्या दैदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देणार्या या स्पर्धेतील द्वितीय क‘मांकाचा पुरस्कार रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘‘अधिक देखणे तरी’’ या नाट्याविष्काराला मिळाला असून या संघाला रू. १,२५,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क‘मांकाचा पुरस्कार मुंबईच्या राम नारायण रूईया महाविद्यालयाच्या ‘‘द्रोणायन’’ या नाट्याविष्काराला देण्यात आला त्यांना रू. १,००,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेळगांवच्या ज्योती कॉलजच्या ‘‘द्रोण’’ व नगरच्या न्यू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ‘‘वैजयंता’’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र व बेळगाव कंेंद्रांतून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या विविध सात संघांच्या नाट्याविष्कारांची महाअंतिम फेरी काल मुंबईच्या रविद्रं नाट्यमंदिरमध्ये स्पर्धकांच्या प्रचंड उत्साहात आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत पार पडली. त्यावेळी उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ साहित्यिक व ९६ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रथमच नाटक सादर करताना काही न काही त्रुटी राहणं साहजिकच आहे. पण नेपथ्य, संगीत, वाड़मय, नृत्य, शिल्प, चित्र अशी सहाही कलांचा समावेश असणारी अशी ही स्पर्धा यापूर्वी झाली नव्हती. हे या स्पर्धेचे ठळक वैशिष्टय आहे.
वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे-
१.सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक(प्रथम)(रू.१५,०००)- मयूर सरकाळे, किशोर गरड (वारसदार, फर्ग्युसन)
२. सर्वोत्कृष्ट संगीत(द्वितीय)(रू.१०.०००) चैतन्य देशपांडे(वारसदार, फर्ग्युसन )
३. सर्वोत्कृष्ट नृत्यसंरचना (प्रथम)(रू.१५.०००)नेहा सांवत (वारसदार,फर्ग्युसन)
४. सर्वोत्कृष्ट नेपथ्य (प्रिथम)(रू.१५.०००) सुदेश पगार आणि किशोर गरड (वारसदार,फर्ग्युसन)
५. सर्वोत्कृष्ट शिल्प (द्वितीय)(रू.१०.०००) सुदेश पगार (वारसदार,फर्ग्युसन)