पुणे-ज्यांना तुम्ही सारे देऊनही घात केला त्या नेते मंडळींना जाऊ द्यात साहेब , आम्ही होतो ,आहोत..आणि सदैव असू ..जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात पुरंदरच्या शिवसैनिकांनी मुंबईत जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साद घातली .
पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेसोबत आहेत. पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी विश्वास देण्यासाठी सर्व 300 पदाधिकारी मुंबई येथे गेले होते ,अशा वेळी साहेबांना भेटून आलेच पाहिजे या भावनेने येथे आलेल्या सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटले. सर्व पदाधिकार्यांनी सांगितले, साहेब आम्हाला काही नको आहे , फक्त शिवसेना आणि तुम्ही पाहिजे.पुरंदर मतदारसंघातील माजी आमदार गेले असले तरी संपुर्ण शिवसेना आणि सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तुमच्या सोबतच आहेत.
पुरंदर मतदारसंघातील फुरसुंगी, शेवाळवाडी, उंड्री , पिसोळी, उरूळी वडाचीवाडी, औताडेवाडी, आंबेगाव पठार, दत्तनगर, मांगडेवाडी, गुजरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी येथून आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मुंबईला भेटीसाठी गेले होते .