लोकसेवा ई स्कूल पाषाण च्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास
पुणे, 7 जुलै : राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत लोकसेवा ई स्कूल पाषाण शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व चतुर्थ क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारतातील पुणे, मुंबई, बडोदा अशा विविध भागातून 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत लोकसेवा ई स्कूलमधील इयत्ता ५ वी मध्ये शिकणाऱ्या आराध्य नेरकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. त्याने लेव्हल 1 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून त्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. आराध्यने 5 मिनिटे 1 सेकंदात 100 गणिते सोडवून हे यश संपादन केले. तर, याच शाळेतील आयुष राणा व सान्वी पाटील या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे झाली. यामध्ये देशभरातून 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते.
लोकसेवा ई स्कूलच्या प्राचार्या जया चेतवानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. लोकसेवा ई स्कुल च्या सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घेवून आपापल्या कलागुणांचा विकास करून करावा यासाठी शाळेकडून पूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत राहील, अशी ग्वाही प्राचार्या जया चेतवानी यांनी दिली.