पुणे-कामयानी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीच्या संस्थापिका व कार्याध्यक्षा श्रीमती सिंधुताई जोशी जन्मशताब्दी सोहळा नुकताच संपन्न झाला . गोखलेनगरमधील कामयानी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये सिंधुताई जोशी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले . यावेळी श्रीमती सिंधुताई जोशी यांच्या काढलेल्या तैलचित्राचे जागतिक स्तरावरचे चित्रकार डॉ. गुरुगोविंद आंबे यांचा सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ देउन विशेष सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमास मेजर जनरल एस सी एस जठार , कामायनी संस्थेच्या विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी , चेअरमन डॉ. अरविंद कुलकर्णी , व्हाईस चेअरमन डॉ. आशूतोष भुपटकर , ब्रिगेडियर रघुनाथ जठार , कामायनी संस्थेच्या प्राचार्या सुजाता आंबे , व्यवस्थापक कालिदास सुपाते , मुख्याध्यापिका हेमा डेरे आदी मान्यवर व कामायनी परिवार उपस्थित होते ,
जागतिक स्तरावरचे चित्रकार डॉ. गुरुगोविंद आंबे यांनी गेले चार महिन्यामध्ये श्रीमती सिधुताई जोशी यांचे चित्र काढले . या चित्राचे आकारमान उंची ४० इंच व रुंदी ३० इंच आहे . अक्रेलिक कलरमध्ये हे चित्र काढले अ सू न चित्रामध्ये जिवंतपणा आणला आहे . त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र व शिल्पांची प्रदर्शने भरविली आहेत . तसेच भविष्यकाळात त्यांनी काढलेल्या चित्र व शिल्पांची प्रदर्शने भरणार आहेत .