‘दगडूशेठ’ ला १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा महानैवेद्य(व्हिडीओ)

Date:

काका हलवाईच्या वतीने अवघ्या ४ तासात साकार ;
बार्शीच्या गणेशभक्ताने केला अर्पण 
 
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला असून काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे  यांनी कारागिरांच्या सहाय्याने अवघ्या ४ तासात हा मोदक साकारला आहे.
यंदाचा देखावा असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात १२६ किलो मोदक पाहण्यासोबतच त्याचे फोटो घेण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. गाडवे यांच्यासह काका हलवाईमधील ६ ते ८ कामगारांनी हा मोदक तयार केला आहे. अत्यंत आकर्षक कलाकुसर व सजावट या मोदकावर करण्यात आली आहे.
युवराज गाडवे म्हणाले, माव्याच्या मोदकावर काजू, बेदाणे, बदाम, केशर यांसह विविध प्रकारचा सुकामेवा लावण्यात आला आहे. याशिवाय वरच्या बाजूला चांदी व सोन्याचे वर्क लावण्यात आले आहे. मागील वर्षी देखील ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ किलोचा मोदक साकारण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळनंतर काका हलवाई मध्ये हा ठेवलेला हा मोदक पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युनिफाइड डीसीपीआर म्हणजे काय , घ्या समजून

युनिफाइड डीसीपीआर (UDCPR - Unified Development Control and Promotion...

शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र...

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...