पुणे : खेलो इंडिया वुशु महिला लीगमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणी कटके, आराध्या शिंदे, अनुष्का जैन, स्वीटी मेश्राम यांनी सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेचे आयोजन रांची येथील ठाकूर विश्वनाथ शहादेव इनडोअर स्टेडियम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये घवघवीत यश मिळवले.
वुशु महिला लीग मध्ये विविध प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य, १५ कांस्य पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी रांचीचे खासदार संजय सेठ, आमदार शिल्पी नेहा टिरकी, खेलो इंडियाचे सहाय्यक संचालक नरेंद्र उज्वल, रामकुमार, कृष्णा सामनिया, साईचे डी. दास उपस्थित होते. सर्व खेळाडूंना ऑल महाराष्ट्र वुशुचे अध्यक्ष एस. एस. झेंडे व महासचिव एस. एस. कटके यांचे मार्गदर्शन लाभले.
सुवर्णपदक विजेत्या सीनियर, ज्युनियर आणि सब ज्युनियर गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार, रौप्य पदक विजेत्या सीनियर, ज्युनियर, सब ज्युनिअर विजेत्यांना अनुक्रमे ४० हजार, २० हजार आणि १५ हजार, कांस्य पदक विजेत्या सीनियर, ज्युनियर, सबज्युनियर गटात अनुक्रमे २० हजार, १५ हजार आणि १० हजार अशी रोख पारितोषिके देण्यात आली.
इतर निकाल खालील प्रमाणे :
सांशु सब ज्युनिअर – खुशी तलमले- कांस्य – (३० किलो), अनुष्का जैन – सुवर्ण (३९ किलो), आयुषी घेवारे – कांस्य (४२ किलो), मुक्ता दादवी- कांस्य (४२ किलो), कुमुदिनी बिसेन- कांस्य (४५ किलो), सरस्वती रोंगे- कांस्य, स्वीटी मेश्राम – सुवर्ण, सेजल तायडे – रौप्य, फर्जाना मुलानी – कांस्य (सर्व ४८ किलो).
जूनियर – वैष्णवी दुडमल – कांस्य (४५ किलो)
सीनियर – तनु – रौप्य (५२ किलो), सुमन पाल – कांस्य (५२ किलो) शायना- कांस्य (७० किलो), दीक्षा – कांस्य (७५ किलो)
ताउलू सब ज्युनियर – आराध्या शिंदे – सुवर्ण, समृद्धी शिंदे – कांस्य, मृगाक्षी झोडे – कांस्य
ज्युनियर – सलोनी जाधव – सुवर्ण, सिद्धी शिंदे – रौप्य
सीनियर – श्रावणी कटके ताईजीक्वान, ताईजीजॅन (२ सुवर्ण), तृप्ती चांदवडकर (३ कांस्य)