रेल्वेओव्हरब्रीजसाठी १० वर्षे झगडलो मी अन बोलण्याची संधी मात्र ‘त्या ‘आमदारांना – सेनेच्या माजी खासदाराची खंत (व्हिडीओ)

Date:

पुणे- घोरपडी रेल्वे ओव्हरब्रीज व्हावा म्हणून ३ संरक्षणमंत्री ,१२ खासदारांची कमिटी , ३ शिष्टमंडळे, लोकसभेत 4 वेळा आक्रंदन असा सातत्याने पाठपुरावा केला , संघर्ष केला आणि आता याच रेल्वे पुलाच्या भूमिपूजन समारंभात मात्र मी उपस्थित राहूनही भाजपच्या २ आमदारांना बोलू दिले आणि मला २ मिनिटे बोलू दिले नाही ,अशी व्यथा मांडत भाजपच्या कार्यक्रमातील चंद्रकांत दादा पाटील यांच्या घाईच्या कृतीबाबत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली खंत ‘माय मराठी’ कडे बोलताना व्यक्त केली .
 आज सायंकाळी घोरपडी रेल्वे ओव्हरब्रीज च्या भूमिपूजनाचा समारंभ महापालिकेने आयोजित केला होता . विशेष म्हणजे या समारंभासाठी ज्यांनी श्रम घेतले त्या  स्थानिक नगरसेवकांना देखील भाषणाची संधी मिळाली नाही . यावेळी उपस्थित असलेले खासदार गिरीश बापट यांना देखील बोलण्याची संधी मिळाली नाही . महापौर यांनी प्रास्तविक करत या पुलाची कशी गरज होती ते सांगितले . आणि त्यानंतर हडपसर आणि लष्कर विभागाचे आमदार टिळेकर आणि कांबळे यांनी भाषणे ठोकली . यावेळी ज्यांनी १० वर्षे हा पुल व्हावा म्हणून संसदेत आवाज उठविला , ३ संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात १२ फायली तयार केल्या ,आणि विविध मार्गे सातत्याने प्रयत्न केले ते शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते . त्यांनी मला २ मिनिटे बोलू द्या अशी विनंती केली .पण मला घाई आहे असे सांगत तातडीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील  यांनी माईक चा ताबा घेतला आणि कार्यक्रम संपविला देखील .. गोंधळातच आभार मानले गेले.  चंद्रकांत दादांच्या या साऱ्या घाईघाई च्या कारभारात  शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील मात्र दुखावले गेले . आपण एवढे सारे केले म्हणून येथे आलो आणि २ मिनिटे देखील आपल्याला बोलू दिले नाही याची चुटपूट त्यांना लागून गेली ..त्यानंतर त्यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती...