पुणे : जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र एक करणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचारी तथा निवृत्त पोलिसांच्या मुला मुलींना ५ हजार नोकरी देण्याचे वचन शिवसेनेचे नेते तथा माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी दिले आहे.
महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता रोजगार समस्या सध्या भेडसावत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगली नोकरी मिळावी यासाठी हा एक प्रयत्न आहे. अशी माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या नोकरी महोत्सवाची माहिती २० देशात वाचली गेली असून २२ हजार मुलांनी bit.ly/2Rnl4iB यासंके
सदरील कार्यक्रम १ व २ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पोलीस मुख्यालय, पाषाण, पुणे येथे ठेवण्यात आले असून सकाळी १० वा. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव, पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशन, चंद्रशेखर दैठणकर, खंडेरावजी शिंदे, पी.टी. लोहार, कोल्हापूर जिल्ह्याचे आय.जी. विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, साबदे,न्यायनिरगुणे, मदन चव्हाण, एस.पी.राजहंस, प्रकाश घारगे, धैर्यशील पवार, माधवराव माळवे, राजा तांबट, सोपानराव महांगडे, राजू सोनवणे, काशीनाथ कचरे, भाई शिंदे, राजू सोनूले, ए.पी.आय. मोरे,संपत जाधव, रामराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास संपूर्ण सहकार्य पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आहे. असेही आंधळकर यांनी सांगितले.
५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देणार नोकरी-भाऊसाहेब आंधळकर
Date: