महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकले -पिण्याच्या पाण्याचा प्रश्न..पाणी रे पाणी .(व्हिडीओ).

Date:

पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात .. सारी धरणे तुडुंब भरलीत ,इथे नद्या दुथडी भरून वाहताहेत ..आणि लोकांना दिवसा आड पाणी पुरवठा होतो आहे तो हि कमी दाबाने ..महंमदवाडी-कौसरबाग या २६ क्रमांकाच्याप्रभागाची अवस्था बदलेना ..आणि शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांना मुख्य सभेत वारंवार आवाज उठवून हि अधिकारी कामे करेनात  ..अखेर आज त्यांच्या नागरी आंदोलनात ..आंदोलकांनी चक्क महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप ठोकले … काही काळ. त्यांनी हे कुलूप तसेच ठेवले मात्र नाना भानगिरे यांच्या विनंतीवरून नंतर या कुलुपाची चावी सुरक्षा रक्षकांकडे देवून निषेध व्यक्त केला . अखेरीस अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा आंदोलकांना भेटले आणि पाणीपुरवठा प्रमुख, तसेच अन्य अधिकारी यांना या प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले ..

गेल्या १० वर्षांपासून मिळकतकर भरून देखील माझ्या प्रभागातील नागरिकांना पाण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चिंतामणी नगर, गुलामआली नगर, ससाणे वस्ती, नेहरू पार्क, काळेपडळ, बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड, ईसीपी वास्तू, ड्रिम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, पांगारे मळा, सनश्री, साळुंखे विहार, भीमनगर, साई विहार कॉलनी व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने शिवसेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकारी, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे*यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाइलने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हे टाळे ठोको आंदोलनकरण्यात आले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मेट्रोच्या कामामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या

मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे महापालिका व...

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी...

जावयांना सासरकडील नातेवाईकांकडून मारहाण:पुणे शहरातील दोन घटना, एकाचे नाक फ्रॅक्चर

पुणे -शहरात सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन स्वतंत्र...

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३...