सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार – शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर

Date:

पुणे – पुढील पाच वर्षांत राज्यातील एकही गड असुरक्षित राहणार नाही. तसेच, गडांची डागडुजी, सुशोभीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी व्यक्त केला.पुणे शहर शिवसेनेतर्फे आयोजित किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण अहीर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, विजय देशमुख, पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, महिला आघाडीच्या शहर संघटिका संगीता ठोसर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, अनंत घरत आदी यावेळी उपस्थित होते. 
अहीर म्हणाले, अलीकडे मोबाईलमुळे पुस्तकरूपी इतिहास वाचणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, त्यांची कीर्ती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन किल्ले स्पर्धासारख्या उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे.
बारणे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढून त्याचे ‘महाराष्ट्र देशा’ हे उत्तम पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून राज्यातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाचे दर्शन अनेकांना झाले. किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून छत्रपतीशिवाजी महाराजांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे.
संजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. रमेश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दीनानाथ साठे, सदाशिव भिसे,गणेश टोकेकर, देवा कांबळे, दत्ता भारती, श्रीकांत शिर्के, श्रीकांत रेणके, रुपाली देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत लहान गटात प्रथम जय-जवान मित्रमंडळ, द्वितीय रिहान सय्यद, तृतीय अनुज भुजबळ, चतुर्थ क्रमांक तंजाली शिळीमकर ग्रुप, तर उत्तेजनार्थ जयनाथ ग्रुपने पटकाविला. मोठ्या गटात प्रथम योगेश विस्तुने, द्वितीय विशाल गव्हाणे, तृतीय राजेश मांढरे, हिरामण कोळेकर, चतुर्थ क्रमांक समीर भगत, शिवयोगी प्रतिष्ठाण यांनी पटकाविला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...