अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल 35% ची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत 1000 रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर जवळपास 3500वर होता. अशा प्रकारे मागील 9 दिवसांत कंपनीचे शेअर्स 70%नी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे . विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वातील समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे, बांगलादेश सरकारने अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही या प्रकरणी 6 फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.