पुणे- शिवाजी नगर परिसराचा विस्तारित भाग आणि मोठी लोकसंख्या विचारात घेता येथे सध्या असलेले १ लसीकरण केंद्र अत्यंत अपुरे ठरत असून येथे आणखी २ ते३ लसीकरण केंद्रे उभारावीत आणि त्यातील किमान १ २४ तास सुरु ठेवावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक आदित्य मालवे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
ते म्हणाले .’शिवाजीनगर भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असून
त्यांच्यासाठी आत्ता फक्त एकच महापालिकेचे सेंटर दळवी हॉस्पिटल येथे उपलब्ध
असून ते पुरेसे नाही, तरी महापौरांनी लक्ष घालून शिवाजीनगर भागात आणखी दोन
ते तीन कोव्हीड १९ लस सेंटर व त्या क २४x७ कोव्हीड १९ लसीकरण सेंटर
महानगरपालिका मार्फत उपलब्ध करून द्यावे व या साठी आपण पुढाकार घेऊन
सर्वांना लवकरात लवकर ती उपलब्ध होण्यास सहकार्य करावे, ही विनंती.