सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत अवनीश चाफळेचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय 

Date:

पुणे, 19 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात  पुण्याच्या अवनीश चाफळे याने सातव्या मानांकित नील जोगळेकरचा 6-2, 6-0 असा पराभव करुन सनसनाटी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित लक्ष्य गुजराथी याने ओमकार शिंदेचा 7-5, 6-4 असा तर, चौथ्या मानांकित गुजरातच्या आकांश सुब्रमणियमने महाराष्ट्राच्या अमोघ दामलेचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली.  अभिराम निलाखे याने सनत कढलेला 6-1, 6-4 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित गुजरातच्या अक्षय सुब्रमणियम याने महाराष्ट्राच्या कौशिक कचरेचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्ठात आणले. सहाव्या मानांकित विवान कारंडे याने अर्जुन किर्तनेचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

निकाल: मुख्य ड्रॉ(उप-उपांत्यपूर्व फेरी): मुले: लक्ष्य गुजराथी(महा)[1] वि.वि.ओमकार शिंदे(महा)7-5, 6-4; अवनीश चाफळे(महा)वि.वि.नील जोगळेकर(महा)[7] 6-2, 6-0; आकांश सुब्रमणियम(गुजरात)[4] वि.वि.अमोघ दामले(महा)6-0, 6-1;  तेज ओक(महा)वि.वि.अयान शेट्टी(महा) 3-0 सामना सोडून दिला;विवान कारंडे(महा)[6]वि.वि.अर्जुन किर्तने(महा) 6-3, 6-3;स्वराज ढमढेरे(महा)वि.वि.बलवीर सिंग  6-3, 6-4; अभिराम निलाखे(महा)वि.वि. सनत कढले(महा) 6-1, 6-4;अक्षय सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.कौशिक कचरे(महा)6-2, 6-1;
मुली:
श्रेया पठारे(महा)वि.वि.आदिती रॉय(महा)6-1, 6-2; 
मेहक कपूर(महा)[6]वि.वि.अर्शिन सप्पल(दिल्ली)6-1, 3-0सामना सोडून दिला; प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.मृणाल शेळके(महा)6-0, 6-0;देवांशी प्रभुदेसाई(महा)[8]वि.वि.अभिलिप्सा मल्लिक(महा)6-4, 6-1;

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बांगलादेशात तारिक रहमान सरकारसमोर चौफेर आव्हाने! अवामी लीग रस्त्यावर, जमात-ए-इस्लामीचाही आंदोलनाचा इशारा

राजकीय हिंसाचार, जाळपोळ आणि कामगारांच्या आंदोलनांमुळे तणाव; सात जिल्ह्यांत...

हिमालयात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढणार! शक्तिशाली ‘अल निनो’मुळे हवामानात मोठ्या बदलांचा इशारा

भारतासह नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील काही भागांत अतिवृष्टीची...

उद्योगपतींकडे नोकऱ्यांची विचारणा म्हणजे सरकारच्या रोजगार धोरणाच्या अपयशाची कबुली! काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र

‘करसवलती दिल्यानंतरही रोजगार आणि वेतनवाढ कुठे?’ पंतप्रधानांच्या फिक्कीमधील सवालावरून...

देशात थंडीचा कडाका वाढला! माउंट आबूत सलग दुसऱ्या दिवशी पारा शून्यावर; बिहार-यूपीत दाट धुके, मध्य प्रदेशात पावसाचे सावट

राजस्थानमध्ये गोठवणारी थंडी; मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ढगाळ वातावरणामुळे...