विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतीय राज्यघटनेतील खऱ्या गोष्टी वेळोवेळी सर्वसामान्यांसमोर मांडणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड.उल्हास बापट यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सत्कार केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,महेश हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले ,’ अलिकडच्या काही काळात लोकशाहीला हितावह नसणाऱ्या अनेक गोष्टी राज्यात व देशात घडत आहे.केंद्रातील सत्ताधारी भाजप वेगवेगळ्या पद्धतीने करत असलेल्या साम्राज्य विस्ताराच्या प्रयत्नांमुळे सातत्याने भारतीय लोकशाही धोक्यात येत आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच महाराष्ट्रात घडलेली शिंदे फडणवीस यांची सरकार स्थापना.
देशात सत्ताधारी पक्ष अश्याप्रकारे अराजकता माजवत असताना विरोधी पक्षातील नेत्यांवर विविध चौकश्यांचा ससेमीरा मागे लावत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. तर मग सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायद्याबद्दल अचूक व निःपक्षपाती भूमिका मांडण्याचे काम ॲड.उल्हास बापट यांच्या सारख्या व्यक्ती करत आहेत.भारतीय राज्यघटनेचे तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्ल्हासजींनी या पुढे देखील जे कोणी पक्ष अथवा व्यक्ती अश्याप्रकारे राजकीय हित साधण्यासाठी घटनाबाह्य कृती करतील त्या त्या वेळी आवाज उठवावा हीच अपेक्षा या भेटी दरम्यान व्यक्त करत ॲड.उल्हास बापट यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.