पुणे, 21 एप्रिल 2022 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत रोहन स्ट्रायकर्स, वाडेश्वर विझार्डस या संघांनी दुसरा विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कर्णा मेहता(31धावा) याने केलेल्या संयमपूर्ण फलंदाजीच्या जोरावर वाडेश्वर विझार्ड्स संघाने टीटी टायटन्स संघाचा 11 धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अन्य लढतीत साहिल गोवित्रीकर नाबाद 20धावा व 1-9)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ऍक्वा रायडर्स संघाने वाडेश्वर विझार्ड्स संघाचा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला. तर, नहूश जाधव(नाबाद 51धावा)याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर रोहन स्ट्रायकर्स संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 38 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. गौरव चाफळकर(1-9 व नाबाद 34धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिटीप्राईड सुपरस्टार्स संघाने हॅ-ट्रिक्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
वाडेश्वर विझार्ड्स: 6षटकात 4बाद 56धावा(कर्णा मेहता 31(21,3×4,1×6), ऋषिकेश काळे 2-8)वि.वि.टीटी टायटन्स: 6षटकात 1बाद 45धावा (पराग चितळे 21(21,2×4), समीर कोल्हटकर नाबाद 12); सामनावीर-कर्णा मेहता; वाडेश्वर विझार्ड्स संघ 11 धावांनी विजयी;
वाडेश्वर विझार्ड्स: 6षटकात 4बाद 60धावा(कर्णा मेहता 33(19,2×4,1×6), सिद्धांत सावंत 11, साहिल गोवित्रीकर 1-9, शार्दूल आंबेकर 1-18)पराभूत वि.ऍक्वा रायडर्स: 6षटकात 5बाद 61धावा(साहिल गोवित्रीकर नाबाद 20(13), राजेंद्र बुट्टेपाटील 14, कर्णा मेहता 2-17, शिवकुमार जावडेकर 1-7);सामनावीर-साहिल गोवित्रीकर; ऍक्वा रायडर्स संघ 3 गडी राखून विजयी;
हॅ-ट्रिक्स: 6षटकात 2बाद 69धावा(केतन धुमाळ नाबाद 55(22,4×4,4×6), अर्जुन मेहता 1-9, गौरव चाफळकर 1-9) पराभूत वि.सिटीप्राईड सुपरस्टार्स: 5.2षटकात बिनबाद 70धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 35(15,3×4,2×6), गौरव चाफळकर नाबाद 34(17,2×4,2×6));सामनावीर-गौरव चाफळकर; सिटीप्राईड सुपरस्टार्स संघ 8 गडी राखून विजयी;
रोहन स्ट्रायकर्स: 6षटकात 3बाद 78धावा(नहूश जाधव नाबाद 51(19,3×4,5×6), राही चौधरी 18(7), कौशल अनवलीकर 1-13) वि.वि.मराठा वॉरियर्स: 6षटकात 3बाद 40धावा(शुभंकर हार्डीकर 14, विमल हंसराज 10, कौशल अनवलीकर 11, अविनाश गोडबोले 1-9, ईशान गोडबोले 1-4);सामनावीर-नहूश जाधव; रोहन स्ट्रायकर्स संघ 38 धावांनी विजयी