पंढरपूर-
येथील गणेश देसाई मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ११७ रक्त दात्यांनी सहभाग नोंदवला असून यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या या शिबिरास कायमच आम्ही पाठिम्बा देऊ अशी ग्वाही यावेळी रक्तदात्यांनी दिली.
सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आलेल्या या शिबिरास कायमच रक्तदात्यांचे अनमोल सहकार्य असून यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने अशीच अनेक शिबिरे घेऊन समाजपयोगी कार्य करत राहणार असल्याचे यावेळी गणेश देसाई यांनी सांगितले.
हे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी गणेश देसाई, ओंकार देसाई, राहुल क्षीरसागर, राहुल वरखेडकर, संकेत लाड, युवराज सलगर, ऋषिकेस घळसासी, सुमित खटावकर, स्वप्नील खटावकर, पिंटू बुद्धीनेर, माउली बुद्धीनेर आदींसह गणेश देसाई मित्र परिवाराने सहकार्य केले.