पुणे-
कार्यकर्त्यांनी वस्ती विभागातील महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी – योगेश गोगावले.
वस्ती विभागातील महिला या प्रचंड कष्ट करत असतात,संसाराला हातभार लावण्यासाठी घरकाम व अन्य नोकरी व छोटा व्यवसाय करताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतात व दुखणी अंगावर काढतात,भाजप च्या कार्यकर्त्यांनी वस्ती विभागातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावेत व त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन भाजप चे पुणे शहर अध्यक्ष योगेशजी गोगावले यांनी केले.आज भाजप वर्धापन दिन व योगेशजी गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवणे
परिसरातील सात चाळ,दहा चाळ येथील किशोरवयीन मुलींसाठी मोफत रुबेला लसीकरण शिबीर आयोजित केले होते,यावेळी श्री गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा फेटा,भा.द.खेर यांचे चाणक्य हे पुस्तक ई देऊन मंडळ अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी,संदीप खर्डेकर,राज तांबोळी,मंजुश्री खर्डेकर,कुलदीप सावळेकर, जयंत भावे,अमोल डांगे,वर्षा डहाळे,गौरी करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुणे शहरातील सर्व वस्त्यांमधील किशोरवयीन मुलींना रुबेला ची लास मोफत देण्याचा उपक्रम रोटरी क्लूब ऑफ पुणे युनिव्हेरसीटी व निरामय संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणार असून रुबेला फ्री पुणे हे मिशन असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.टप्प्या टप्प्याने शहरातील सर्व वस्त्या व मनपा शाळांमधील मुलींना ही लास मोफत देण्यात येणार असून आज पक्षाच्या वर्धापनदिनी या वस्तीतून या मोहिमेचा प्रारंभ करत असल्याचे सौ खर्डेकर म्हणाल्या.यावेळी संगीता आदवडे,मंगल शिंदे,प्रमिला फाले,अनुराधा एडके,कीर्ती गावडे,बागेश्री ठिपसे,सुशीला साठे,नंदू शर्मा,गजानन माजीरे,जनार्दन क्षीरसागर,प्रताप चोरगे,गणेश पासलकर,ई मान्यवर उपस्थित होते.
मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक संगीता आदवडे यांनी स्वागत तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले.