मुलींच्या शिक्षणासाठीच्या पहिल्या शाळेत पहिले सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा आनंद आणि अभिमान ही-सबिना संघवी.
पुणे-विद्यार्थिनींनी त्यांच्या आरोग्याबरोबरच शारीरिक स्वच्छतेची ही काळजी घ्यावी,मासिक पाळी ही निषिद्ध गोष्ट नसून एक नैसर्गिक क्रिया आहे, निसर्गाने ही जबाबदारी स्त्रियांवर टाकली आहे त्यामुळे याकाळात मुलींनी आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असून त्याकाळातील मानसिक साठ्यांतराशी जुळवून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ. मेधा कुलकर्णी यांनी केले. यासाठी सौ मंजुश्री खर्डेकर यांनी हे मशीन बसवले हे कौतुकास्पद असून या माध्यमातून मुलींचे स्वास्थ्य अधिक चांगले राहण्यास मदत होईल असे ही त्या म्हणाल्या.
सौ मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आल्या त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक शिक्षण मंडळ सदस्य मंजुश्री खर्डेकर,फिक्की ( FICCI Flo ) च्या महिला विभागाच्या प्रमुख सबिना संघवी, पिंकी राजपाल, स्वयम संस्थेच्या उषा पूनावाला, रितू छाब्रिया, कर्वे शिक्षण संस्थेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष विद्याताई देशपांडे, संजीवनी कर्वे, सौ देशपांडे, भाजप च्या माणिकताई दीक्षित, कल्पनाताई पुरंदरे, बागेश्री ठिपसे, प्राची बगाटे,इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक पार संबोधन करताना सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या कि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही महत्वाकांक्षी मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या प्रकृतीची व स्वच्छतेची काळजी घेणे ही आवश्यक आहे, हे ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. सुमारे ३५०० विद्यार्थिनींना याचा फायदा होणार असून सुरुवातीचे चार महिने मुलींना नॅपकिन मोफत देण्यात येणार आहेत त्यानंतर अत्यल्प दरात हे नॅपकिन पुरविण्यात येतील त्यासाठी देणगीदारांशी संपर्क करत आहोत. सौ खर्डेकर म्हणाल्या कि मुलींनी मासिक पाळी बाबत भीती बाळगू नये, ही एक नैसर्गिक क्रिया आहे व ज्याप्रमाणे शरीर नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकतो तसेच हा रक्तस्त्राव आहे. तसेच या बाबत मुलींनी आपल्या शिक्षिका, मैत्रिणी किंवा घरातील महिलांशी आई शी संवाद साधावा.
स्त्री शिक्षणासाठीच्या पहिल्या शाळेत असे पहिले मशीन बसविल्याचा आनंद अवर्णनीय असून अजून ५ शाळांमध्ये आम्ही असे मशीन बसवू असे फिक्की ( FICCI Flo ) च्या महिला विभागाच्या प्रमुख सबिना संघवी म्हणाल्या. स्वयम संस्थेच्या उषा पूनावाला म्हणाल्या कि आम्ही स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असून विविध वयोगटातील मुलींसाठी अनेक उपक्रम राबवित आहोत. स्वयम संस्थेच्या रितू छाब्रिया यांनी चार महिन्यासाठीचे सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरविले असून त्यानंतर ही अत्यल्प दरात हे नॅपकिन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहू. असे ही त्या म्हणाल्या.
संयोजक सौ मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, सौ विद्या देशपांडे यांनी स्वागत, सौ कुलकर्णी यांनी सूत्र संचालन तर सौ संजीवनी कर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.