सॅमसंगतर्फे गॅलेक्सी जे सेव्हन मॅक्स, गॅलेक्सी जे सेव्हन प्रो सॅमसंग पे सुविधा आणि पहिल्यांदाच सोशल कॅमेऱ्यासह लाँच

Date:

नवी दिल्ली – सॅमसंग इंडियाने आज सॅमसंग गॅलेक्सी जे सेव्हन मॅक्स आणि सॅमसंग गॅलेक्सी जे सेव्हन प्रो लाँच करत गॅलेक्सी जे ही स्मार्टफोन्सची सर्वाधिक विकली जाणारी श्रेणी विस्तारण्याची घोषणा केली. भारतातील सर्वाधिक पसंतीची स्मार्टफोन मालिका आता सॅमसंग पे आणि नव्या सोशल कॅमेऱ्यासारख्या क्रांतीकारी सुविधांसह उपलब्ध झाली आहे.

 

 सॅमसंग गॅलेक्सी जे सीरीज सॅमसंगला भारतीयांप्रती वाटणाऱ्या बांधिलकीचे प्रतीक आहे. जे सीरीज अल्ट्रा डेटा सेव्हिंद्ज, एस बाइक मोड, एस पॉवर प्लॅनिंगसारख्या मेक फॉर इंडिया नाविन्यांनी सजलेली असून त्यामुळे जे स्मार्टफोन्सचे मूल्य वाढले आहे. या नाविन्यपूर्ण सुविधांमुळे ग्राहकांच्या मोबाइल वापरासंदर्भातील विशिष्ट समस्यांवर उत्तर मिळाले असून भारतीय ग्राहकांमध्ये ही सीरीज सर्वाधिक लोकप्रिय करण्यासाठी त्याची मदत झाली आहे. सॅमसंग पे आणि सोशल कॅमेऱ्यासारख्या सुविधा गॅलेक्सी जे सेव्हन आणि गॅलेक्सी जे सेव्हन प्रो या नव्या उपकरणांमध्ये समाविष्ट करत सॅमसंग हा वारसा पुढे नेत आहे.

या शक्तीशाली स्मार्टफोन्सचा ग्राहकांना विविध कारणांसाठी वापर करता येणार असून सॅमसंगची ही उपकरणे ग्राहकाच्या बहुआयामी जीवनशैलीला सुसंगत बनवण्यात आली आहेत.

‘मध्यम प्रकारच्या स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंग जे सीरीज आघाडीच्या स्थानावर असून भारतीय ग्राहकांकडून त्याला सातत्यापूर्ण मागणी मिळत आहे. सॅमसंगमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांचे जीवनमान उंचावेल अशा प्रकारचे अर्थपूर्ण नाविन्य त्यात समाविष्ट करतो. मध्यम प्रकारच्या बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही गॅलेक्सी जे सेव्हन आणि गॅलेक्सी जे सेव्हन प्रो ही दोन नवी मॉडेल्स लाँच केली आहेत. सॅमसंग पे आणि सोशल कॅमेऱ्यासारखी अधिक दर्जेदार व क्रांतीकारी वैशिष्ट्यांमुळे आमचे आघाडीचे स्थान अधिक बळकट होईल,’ असे श्री. सुमीत वालिया, संचालक, मोबाइल व्यवसाय, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले.

 

सॅमसंग पे च्या मदतीने केव्हाही भरा पैसे

 

नुकतीच लाँच करण्यात आलेली सॅमसंग पे ही सुविधा गॅलेक्सी जे सेव्हन प्रोवर उपलब्ध करण्यात आली आहे, तर गॅलेक्सी जे सेव्हनमध्ये सॅमसंग पे मिनी ही सुविधा देण्यात आली आहे.

सॅमसंग पे ग्राहकांना त्यांच्या सॅमसंग स्मार्टफोनचे वॉलेट, क्रेडिट व डेबिट कार्डमध्ये रुपांतर करता येऊ शकते. सॅमसंग पे च्या मदतीने ग्राहकांना पेटीएम तसेच सरकारचे युनिफाइड पेमेंट इंटरफेज (यूपीआय) वापरता येईल आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनवर फोन केवळ टॅप करून केव्हाही पैसे भरता येतील. सॅमसंग पे च्या सोप्या, सुरक्षित आणि सर्वत्र लागू होणारे वैशिष्ट्य देशभरातील सर्व प्रमुख पीओएस टर्मिनल्सवर वापरता येते. सॅमसंगचे पेटंटेड तंत्रज्ञान – मॅग्नेटिक सिक्युअर ट्रान्समिशनमुळे (एमएसटी) सॅमसंग पे नेहमीच्या पीओएस मिशनवर वापरता येते आणि त्यामुळे सॅमसंग पे सर्व प्रकारच्या दैनंदिन व्यवहारांसाठी वापरता येते.

सॅमसंग पे मिनी भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांच्या अभिनव गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आले असून ते युपीआय व ई- वॉलेटसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ पुरवते. सॅमसंग मिनी पहिल्यांदा गॅलेक्सी जे सेव्हन मॅक्सवर लाँच करण्यात येईल व त्यानंतर सध्याच्या निवडक जे सीरीजमध्ये समाविष्ट केले जाईल.

एडिट, शेअर, डिस्कव्हर करा सोशल कॅमेऱ्यासह

दोन्ही स्मार्टफोन्सना १३ एमपी फ्रंट कॅमेरा आणि एफ १.९ लेन्स व बॅक कॅमेरा (गॅलेक्सी जे सेव्हन प्रोमध्ये फ्लॅट बॅक) एफ१.७ लेन्स, फ्लॅशसह देण्यात आला असून आतापर्यंत ही सुविधा केवळ सॅमसंगच्या प्रमुख फोन्समध्येच उपलब्ध होती. एफ१.७ आणि एफ१.९ लेन्सेसमुळे ग्राहकाला कमी प्रकाशात आणि अंधुक उजेड असलेल्या परिसरात चांगले फोटो व उठावदार सेल्फी घेता येतात.

सोशल कॅमेरा हे आमचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहकांना इन्स्टंट शेअरिंग, इन्स्टंट एडिटिंग आणि इन्स्टंट डिस्कव्हरीसह नव्या पद्धतीने स्मार्टफोन कॅमेरा वापरायची सोय देते. ग्राहकांना आता त्यांचे आवडते कॉन्टॅक्ट्स आणि सोशल मीडिया कॅमेऱ्यामध्ये पिन करता येतात आणि क्लिक केल्यावर लगेचच थेट शेअर करता येतात. इन्स्टंट एडिटिंगवरील लाइव्ह फिल्टर्स किंवा लाइव्ह स्टिकर्सच्या मदतीने ग्राहकांना सोशल मीडियासाठी लगेच कंटेट तयार करता येतो व तो लगेच सोशल मीडिया अप्सवर शेअर करता येतो. यामुळे इतर इमेज एडिटिंग अपवर अवलंबून राहावे लागते नाही. इन्स्टंट डिस्कव्हरी वैशिष्ट्यामुळे अत्याधुनिक रिअलिटी कॅमेऱ्याला नवा आयाम लाभला असून त्यामुळे ग्राहकाला त्याच्या भोवतीच्या परिसराती लोकप्रिय फोटोग्राफी ठिकाणे, रेस्टॉरंट्स व खरेदीची ठिकाणे शोधता येतात.

कामगिरी

गॅलेक्सी जे सेव्हन मॅक्सला १.६ जीएचझेड ऑक्टा कोअर प्रोसेसर, ३३०० एमएएच बॅटरी आणि चार जीबी रॅम देण्यात आल्यामुळे त्यावर अतिशय सुलभ पद्धतीने मल्टीटास्किंग करता येते. गॅलेक्सी जे सेव्हन प्रोमध्ये १.६ ऑक्टा एक्सनॉस प्रोसेसर, तीन जीबी रॅम, ३६०० एमएएच बॅटरी देण्यात आल्यामुळे वापरात कोणताही अडथळा येत नाही. ही दोन्ही उपकरणे जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्यासाठी व दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह तयार करण्यात आली असून त्यामुळे सफाईदार वापर अनुभवता येतो. दोन्ही स्मार्टफोन्ससाठी मेटल युनिबॉडी वापरल्यामुळे ते स्टायलिश दिसतात. या शक्तीशाली स्मार्टफोन्सचा ग्राहकांना विविध कारणांसाठी वापर करता येणार असून सॅमसंगची ही उपकरणे ग्राहकाच्या बहुआयामी जीवनशैलीला सुसंगत बनवण्यात आली आहेत.

गॅलेक्सी जे मॅक्स आणि गॅलेक्स जे सेव्हन प्रो ग्राहकांना अनुक्रमे १७,९९० आणि २०,९०० रुपयांत व काळ्या व सोनेरी रंगात खरेदी करता येतील. गॅलेक्सी जे सेव्हन मॅक्स देशभरातील सर्व रिटेल दालनांमध्ये २० जून २०१७ पासून, तर गॅलेक्स जे सेव्हन जुलै महिन्याच्या मध्यावर उपलब्ध होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे मॅक्सची वैशिष्ट्ये

 

 

डिस्प्ले ५.७ इंची एफएचडी टीएफटी
कॅमेरा १३ एमपी फ्लॅश +१३ एमपी फ्लॅश
मेमरी ४ / ३२ जीबी (३ स्लॉट्स)
डायमेन्शन्स ८.१ एमएम
बॅटरी ३३०० एमएएच
प्रोसेसर १.६ ऑक्टा प्रोसेसर मीडियाटेक
कनेक्टिव्हिटी फोर जी, कॅटफोर
ओएस नॉगट

 

रंग काळा आणि सोनेरी

 

सॅमसंग गॅलेक्सी जे सेव्हन प्रोची वैशिष्ट्ये

 

डिस्प्ले ५.५ इंची एफएचडी एसअमोल्ड
कॅमेरा १३ एमपी फ्लॅश +१३ एमपी फ्लॅश
मेमरी ४ / ३२ जीबी (३ स्लॉट्स)
डायमेन्शन्स ७.८एमएम
बॅटरी ३६०० एमएएच
प्रोसेसर १.६ ऑक्टा एक्सनॉस
कनेक्टिव्हिटी फोर जी, कॅटफोर
ओएस नॉगट

 

रंग काळा आणि सोनेरी
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...