पुणे – नाट्य चित्र कला अकादमी पुणे यांनी संस्थेच्या कार्यालयात दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत तिवडे यांनी केले होते . दिवाळी फराळचा अस्वाद घेता घेता कलाकारांनी आपली कला सादर केली तर कवींनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली .
कोव्हीड च्या लॉक डाऊन नंतर हा कार्यक्रम होत असल्याने मोठ्या संख्येनं संस्थेचे सभासद हजर होते .प्रत्येकाच्या चेहेर्यावर एकमेकांना भेटल्याचा आनंद ओसांडून वहात होता . संस्थेचे कार्याध्यक्ष सीताराम नरके यांनी सदस्यांचे स्वागत करताना अजीवन सदस्य होण्यासाठी अवाहन केले . अध्यक्ष सुर्यकांत तिवडे यांनी संस्थेच्या पुढील उपक्रमांची माहीती दिली . मराठी चॅनेलवर लवकर च नाट्य चित्र कला अकादमीची मालिका पहाण्यास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .. आजीवन सदस्यत्वासाठी अशीष लोंढे, राकेश परदेशी आणि अभिनेतेविश्वास रांजणे यांचे अभार मानले . लेखक दिग्दर्शक सुरेश पाटोळे लिखित अण्णाभाऊ साठे यांचा चरित्र ग्रंथ सीताराम नरके यांनी संस्थेला भेट दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले .
प्रमुख पाहुणे चित्रपट दिग्दर्शक विजय चव्हण उपस्थित होते . त्यांनी आपल्या मनोगतात देवा रे देवा या वेबसिरीज मध्ये संस्थेच्या कलाकारांना संधी देणार असल्याचे जाहीर केले.
दिवाळी फराळ कार्यक्रमाला अभिनेते सुनील कुसेगावकर,नंदकुमार पाटील, करावके गायक संदीप क्षिरसागर , अशीष लोंढे, गणेश घुले, गुजाभाऊ ताम्हाणे, सिने अभिनेत्री संध्या लोंढे, ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, राकेश परदेशी, गायक अभिनेते जयराज मोरे, अमीर शेख, चित्रपट दिग्दर्शक विजय चव्हाण, संस्थेचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ कवी सीताराम नरके आणि अध्यक्ष सुर्यकांत तिवडे अकादमीचे सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने हजर होते .
सचिव सुनील कुसेगावकर यांनी कार्यकमाचे बहरदार सुत्रसंचालन केले तर गायक अभिनेतेजयराज मोरे यांनी आभार मानले .