अघोषित लॉकडाऊनवर फेरविचार करा : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Date:

व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाची भेट

मुंबई, 7 एप्रिल-राज्य सरकारने २ दिवसांचा म्हणता म्हणता अघोषित असा लॉक डाऊन च पुकारला यावर तातडीने फेरविचार करावा असा इशारा आज माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विविध व्यापारी संघटनांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एकूणच अर्थकारणाला, यातून केवळ व्यापार नाही, तर श्रमिकांच्याही अर्थकारणाला बसलेली मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे तातडीने या निर्बंधांबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी या संघटनांनी केली.

यात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्स, मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, फॅब्रिक मर्चंटस असोसिएशन, भारत मर्चंट चेंबर्स, कन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, वैश्य महासंमेलन, नॅसकॉम आणि इतरही संस्थांचा समावेश होता. या व्यापारी बांधवांनी यावेळी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागला, त्यावेळी आम्ही सहकार्य केले. पण, आता पुन्हा इतके कठोर निर्बंध हे आत्महत्येसारखेच पाऊल ठरेल, असे संघटनांनी सांगितले. अशाप्रकारचे निर्णय घ्यायचेच असतील, तर सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना एकदा तरी बोलावून ऐकून घ्यायला हवे होते, अशाप्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या सर्व व्यापार्‍यांनी श्रमिकांच्या भोजनाची, प्रवासाच्या खर्चाची व्यवस्था केली. पण, सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. कोरोना काळात सुद्धा सामाजिक जाणीवेतून निधी गोळा करून गरजूंना मदत करण्याचे काम या संघटनांनी केले. मात्र, आज एप्रिल महिनाभर त्यांचा व्यापार पूर्णपणे बंद करून टाकण्यात आला आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या फारच मोठ्या आहेत. आज मुंबई किंवा अनेक मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक हे रात्रीच्या जेवणासाठी टेकहोम वर विसंबून असतात. 31 मार्च रोजी विविध कर जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणून पैसे भरायला लावले. गेले वर्षभर प्रत्येकच जण आर्थिक तणावात आहे. मात्र, उधारी घेऊन हे विविध कर जमा करायला सांगून आता पूर्णच व्यापार बंद करण्यात आला आहे, अशा व्यथा त्यांनी व्यक्त केल्या. एवढेच नाही तर जे व्यवहार केवळ फोनवरून ऑर्डर घेतल्या जातात आणि वितरण केले जाते, असेही व्यवसाय पूर्णपणे ठप्प करण्यात आल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.

ही सर्व निवेदने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र लिहून पाठविली आहेत. या स्थितीचा फेरआढावा घ्यावा आणि तत्काळ सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...