चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार

Date:

पुणे-चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगतगुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. १६ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती चतु:शृंगी देवस्थानचे अध्यक्ष नितीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त हेमंत अनगळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य मंदीर, सभामंडप, आजुबाजुच्या भाग आणि कळस यांचा समावेश असणार आहे. या साठी साडेतीन कोटी रुपये खर्च येणार असून, सुमारे दीड वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. सुमारे सहा हजार ७०० चौरस फूटाचे नवीन बांधकाम होणार आहे. देवीचा गाभार्यात बदल केले जाणार नाहीत. सभामंडप सहा फूटाने मोठा होणार आहे.

पुरातत्व खात्याच्या मान्यतेनुसार मंदिराची जुनी मराठा शैली किंवा पेशवे शैली कायम असणार आहे. बांधकाम सुरू असताना भाविकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात भाविकांची सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे.

दुसर्या टप्प्यात गणपती मंदीर, आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण, धबधबा, उद्यान, ध्यानमंदिराचा समावेश असणार असून, तिसर्या टप्प्यात सांस्कृतिक कार्यालय, नवीन कार्यालयाची इमारत, सरकता जिना यांचा समावेश असणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, भाविकांनी सढळ हाताने देणगी द्यावी असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी chatturshringidevasthanpune.org या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

चतु:शृंगी देवीचे मंदिर पेशवकालीन आहे. सप्तशृंगीचे परमभक्त पेशव्यांचे सावकार दुर्लभशेठ यांना वय झाल्यामुळे वणी, नाशिक येथे दर्शनाला जाणे अशक्य झाले. तेव्हा देवीने दृष्टांत देऊन या ठिकाणी उत्खनन करायला सांगितले. ही देवी चार डोंगराच्यामध्ये असल्याने तिला चतु:शृंगी असे नाव मिळाले. कालांतराने दुर्लभशेठ यांच्या नातवाने देखभाल करण्यासाठी दस्तगिर गोसावी यांच्या ताब्यात मंदिर दिले. १८२० मध्ये ते अनगळ कुटुंबियांकडे आले. मंदिराच्या परिसरातील १६ एकर जागा अनगळांनी विकत घेतली. नवरात्रीत मोठी यात्रा भरते. पुणे शहराची अधिष्ठात्री म्हणून या देवीची ओळख आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...