पुणे- प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खान याची कबरच राज्य सरकारने काढून टाकावी. तसेच, औरंगजेबाची कबरही हटवावी, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. त्याच बरोबर श्रीमंत कोकाटे यांना अफझल च प्रेम का ? कबर हवीच कशासाठी ? कोणासाठी ?महाराजांना मारायला आलेला अफझल, तुळजापूर च मंदिर आणि मूर्ती तोडणारा अफझल, त्या मंदिरात गायी कापणारा अफझल कोकाटे यांना जवळचा का वाटतो ?महाराजांनी मन मोठं दाखवलं वगैरे सगळ खोटं आहे…अफझल च मुंडक प्रताप गडावर नाचवलं होत, जिजाऊंच्या पायावर ठेवलं होत हे का विसरतोय आपण, आत्ता तर कबर महाराजांनी बांधली हेच खोटं असल्याचे सिद्ध झालं आहे असे स्पष्ट शब्दात आनंद द्वे यांनी म्हटले आहे.
आज पहाटे 4 वाजेपासूनच अफजल खानाजवळील अनधिकृत बांधकम शासनाकडून पाडण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, सरकार कबरीच्या जवळील अनधिकृत बांधकाम हटवत आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र शासनाने एवढ्यावरच न थांबता अफजल खानाची कबरच काढून टाकावी.
आनंद दवे म्हणाले, केवळ अफजल खानच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबरही उद्धवस्त करावी, अशी आमची मागणी आहे. या राक्षसांचे दैवतीकरण करण्याचे काम काही स्वराज्यातील कंटकच करत आहे. या राक्षसांनी छत्रपती शिवाजी महाराजांना, हिंदूना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या कबरी नकोत. सरकारला त्यांची कबर पाडता येत नसेल तर हिंदू महासभा ते काम करेल, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला.
आनंद दवे म्हणाले, स्वराज्यावर हल्ले करणाऱ्यांचे काय हाल होतात हे पुढच्या पिढीला कळावे, यासाठीच शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफलज खानाची कबर बांधली. मात्र, काही जणांनी यावरुन शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे पाप केले. अफजल खानच्या काही भक्तांकडून असे प्रयत्न करण्यात आले. अफजल खानाच्या वधानंतर साडेतीनशे वर्षांनंतरही हिंदुस्थानविरोधातील त्यांचा द्वेष कमी झालेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कबरीच उद्धवस्त केल्या पाहीजेत.
आनंद दवे म्हणाले, आज शिवप्रताप दिन आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. हिंदूची दिवाळीची सुरुवात इथूनच झाली. त्यामुळे आज हिंदु महासभेतर्फे सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पुण्यात काही ठिकाणी लावलेल्या बॅनरवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, हे बॅनर आम्ही काढणार नाही. बॅनर काढल्यास हिंदू महासभेतर्फे आंदोलन केले जाईल.
अफझल ची कबर महाराजांनी बांधली हेच धांदात खोटं आहे हे सांगताना त्यांनी काही कागदपत्रे दिलीत ती पुढीलप्रमाणे ..

अफजलखानाची प्रतापगड येथील कबर – सातारा जिल्हा गँझेटियर मधील नोंदी
१८८५ च्या Gazeteer मध्ये अफजलखानाच्या कबरीचा उल्लेख देखील नाही. (Page 545 onwards)

१९१६ साली द.बा.पारसनीस यांनी घेतलेल्या फोटो मध्ये एका छोट्या तात्पुरत्या मांडवाखाली उभ्या केलेल्या थडगेसदृश्य आकृतीला अफजलखानाचे थडगे म्हणून दाखवण्यात येते

१९६३ च्या Gazeteer मध्ये फक्त अफजलखानाच्या कबरीचा उल्लेख. (Page875 1963 Gazeteer) सय्यद बंडाच्या कबरीचा उल्लेख नाही. कोणी बांधली याचाही उल्लेख नाही. अफजलखान थडगे कमिटी इथे उरुसाचे आयोजन करते असा उल्लेख आहे

रस्त्याच्या कडेला चार दगडांवर चादरी टाकून अचानक उभे राहिलेले अनेक दर्गे तुम्ही पाहिले असतील, त्यातलाच हा प्रकार असावा.

