पुणे – न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडने आयोजित केलेल्या लक्ष्मीबाई रानडे राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या गिरीश शिंदे याने विजेतेपद मिळविले. स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे सारे बदलायचे आहे, विज्ञानाचे सामर्थ्य, पुरे तो मोबाईल, काश्मिर एक ज्वलंत प्रश्न, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, ज्ञानेश्वरी जीवनाचा आधारस्तंभ या विषयांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
पहिला क‘मांक – गिरीश शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
दुसरा क‘मांक – प्रणव नायकवडी, सरस्वती विद्यामंदिर
तिसरा क‘मांक – वेदांत बोरावके, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
चौथा क‘मांक – प्रसन्न भोसले, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
पाचवा क‘मांक – सुयोग वाल्हेकर, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी
दिलीप गरुड, सुरज कुलकर्णी, मुकुंद तेलचेरी, मीना वैद्य, माणिकराम जाधव, विदुला पाठक यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.