चित्रपट धडपड्या तरुणांना “साधन” ची साथ!!

Date:

सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

सदाशिव अमरापूरकर  – एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला ग्रामीण भागातल्या टॅलेंटच्या ताकदीची जाणीव करून देणारा या सृष्टीतला एक प्रमुख शिलेदार. चित्रपटसृष्टीची काहीही माहिती नसताना, कोणाचीही मदत नसताना, स्वतःचा मार्ग काढणं हे किती कठीण असतं याची जाणीव स्वतः प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा अमरापुरकरांना होती.

अमरापूरकर गेल्यानंतर त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कलाकारांबद्दलच्या कळवळ्याला पुढे नेत, एक मूर्त स्वरूप देण्याचं काम सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट सातत्याने करत आहे. यातलंच एक पाऊल म्हणजे “साधन” हा उपक्रम. “साधन” मधून चांगली कथानके घेऊन चित्रपट निर्मिती करू इच्छीणाऱ्या प्रोजेक्टना लागणाऱ्या equipments ची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.

विनोद तावडे यांनी सांगितले – ” ग्रामीण भागात अभिजात कलेची कमतरता नाही.. पूर्वी कथा कविता यातून आपली सर्जनशीलता जगासमोर मांडली जायची… पण आता डिजिटल जगाबरोबर चालताना दृक्श्राव्य माध्यम वापरून जगासमोर आपल्या मनातली गोष्ट सांगायचं प्रमाण वाढलं आहे… पण जागतिक स्पर्धेत तांत्रिक बाबींमुळे हे कलाकार मागे पडतात. कारण चांगली साधन सामुग्री या कलाकारांकडे नसते.. किंवा व्यावसायिक साधन सामुग्री वापरण्यासाठी लागणारे पैसे यांच्या कडे नसतात. तर अश्या चांगल्या आणि अभिजात कथानकांना आम्ही ही मदत देणार आहोत.”

या वेळी माहिती देताना रिमा अमरापूरकर यांनी सांगितलं – ” ज्यांना ही स्कॉलरशीप हवी आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधून, त्यांच्या प्रोजेक्टची सर्व माहिती आम्हाला कळवायची आहे. ग्रामीण भागातले ग्रुप, चित्रपट शास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक संस्था यांना या मध्ये प्राधान्य दिले जाईल. ट्रस्ट तर्फे एक कमिटी नेमण्यात येईल, जी स्कॉलरशीपसाठी पात्र प्रोजेक्ट ठरवेल. प्रोजेक्ट पात्र ठरल्यानंतर, त्यांनी त्यांची पूर्ण केलेली स्क्रिप्ट रजिस्टर करून, त्याची झेरॉक्स आणि इतर काही माहिती पाठवायची आहे. या आधारे स्कॉलरशीपसाठी योग्य प्रोजेक्ट निवडले जातील, व त्यांना पूर्ण किंवा आंशिक स्कॉलरशीप दिली जाईल. या मध्ये शोर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी तसंच फीचर फिल्मचा ही समावेश असेल.”

सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट गेली तीन वर्ष, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील शाळा व कॉलेज या मधून चित्रपट रसग्रहण कार्यशाळा तसेच चित्रपट बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेत आहे.

श्री. विनोद तावडे, श्रीमती सुनंदा अमरापूरकर, श्री. राजाभाऊ अमरापूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ.उमा कुलकर्णी, श्री. विनोद शिरसाठ आणि श्रीमती रिमा अमरापूरकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. ११ मे २०१८ – अमरापुरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून या  उपक्रमाची सुरुवात करण्यात येणारं असून, ज्यांना या उपक्रमाचा भाग व्हायचे आहे किंवा त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना connect@sadashivamarapurkar.org  या इमेलशी संपर्क साधून सर्व माहिती मिळेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...

ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडावाव्यात-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.१० : ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेवून त्या...