पुणे-शहरातील विविध भागात रात्री आठनंतर ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी पाऊस सुरु होण्यापूर्वीच अनेक भागात वीज गेली होती आणि पावसाचा सिग्नललोकांना मिळाला . जोरदार वारे प्रथम वाहू लागले आणि त्यानंतर पाऊस कोसळला पुण्यात पावसामुळे झाडे पडण्याच्या सुमारे 40 घटना घडल्याचे वृत्त आहे .एकीकडे पावसामुळे अनेकांची त्रेधा उडाली ,अनेक दुचाकी वाहने घसरली तर दुसरीकडे या पावसाचे आनंदाने स्वागत करणारी मंडळीही दिसत होती .
वळीवाच्या पावसाने काल सायंकाळी शहरातील काही भागात हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत काही अंशी गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. त्यानंतर आज दिवसभर पुन्हा उकाडा जाणवत होता. रात्री आठनंतर अनेक पुण्यातील सदाशिवपेठ, कर्वे रोड, एसएनडीटी, कोथरूड, हडपसर परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा गारवा जाणवला. परिसरात मातीचा सुगंध दरवळत होता.
तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र, तारंबळ उडाली. अनेक भागातील बत्ती गुल झाली. तर सिग्नल बंद पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.