भारतातल्या अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाने आपली पाळेमुळे रोवली आहेत. अलीकडच्या काळात नक्षलवादी कारवायांच्या वाढलेल्या घटना याचा प्रत्यय देतात. हा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाचे हेच प्रयत्न जगासमोर आणण्यासाठी श्री दर्श प्रोडक्शन निर्मित आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर कृत मराठीतला दुसरा आणि मराठी बालचित्रपटातील पहिला थ्रीडी चित्रपट “ग्रेट माय इंडिया’ येत्या शुक्रवारी (19 मे) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
श्री दर्श प्रोडक्शन निर्मित अत्यंत गंभीर विषयावर बेतलेल्या या बालचित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद डॉ. शाशिकांत डोईफोडे यांची आहे. आर्या घारे, श्रीश खेडेकर, प्रथमेश माने, प्रार्थना बांदवडेकर, हरीष धोंगडे, धर्मेंद्र यादव, भाई मुंढे, गोरक्षनाथ कांडगे, आर्या गंबरे, श्री पाठारे, विघ्नेश पाटोळे, अजय चव्हाण, सदिच्छा सावंत, श्रावणी पाटील, रेश्मा कडेकर, शिल्पा पाटील, जयश्री कडेकर, अक्षय पिसे, मनीषा खेडेकर, शालन निकम, अनघा देढे, संगीता कुलकर्णी, किशोर घाडगे, सुरज बागाव, स्नेह पवार, प्राजक्ता माळी इ. कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे सहदिग्दर्शन आणि संकलन साची शहा आणि अनिल शहा यांनी केले असून सहसंकलन परवीन यादव, विनोद यादव यांनी केले आहे. नंदेश उमप यांनी या चित्रपटात पार्श्वगायन केले असून पार्श्वसंगीत मयूर बहुळकर व अजित काकडे यांचे आहे. चित्रपटाचे छायाचित्रण सुमित कदम यांनी केले आहे. या चित्रपटातील गीते दिलीप शेंडे आणि कै. विजय शिंदे यांची असून त्याला गुरु सूरदास यांनी संगीत दिले आहे.
डॉ. खेडेकर म्हणाले, आतंकवाद, नक्षलवाद शब्द उच्चरले तरी अंगावर काटा येतो, आतंकवादी हे शेजारी राष्ट्रातील आहेत मात्र नक्षलवादी हे आपल्याच देशाचे नागरीक आहेत, आपल्या मागण्यांसाठी त्यांनी वेगळा मार्ग स्विकारला त्यांना त्या मार्गापासून परावृत्त करणाऱ्या मुलांची ही कथा आहे.
“ग्रेट माय इंडिया’ पहिला थ्रीडी बालचित्रपट
Date: