पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 150 वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही म्हणून शाळा काढल्या ,तसेच देशातील पहिली मुलीची शाळा भिडे वाड्यात सुरू केली.हे कार्य करताना त्यावेळी जन सामन्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यांचे अडीअडचणी व ध्येयधोरणे आणि व्यथा इंग्रज दरबारी मांडल्या. शेतकऱ्याचे आसूड व गुलामगिरी हे पुस्तक लिहून प्रबोधन केले .यावरून असे दिसते की त्यावेळचे महात्मा फुले हे मोठे अर्थतज्ञ होते. त्यांचे कार्य व आर्थिक नियोजनावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मोलाचे कार्य केल्याचे उद्गार बँकिंग 2018 परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करताना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी काढले.
हा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व अँप्टी अँकॅडमी तर्फे “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” सभागृहात 9 जून 2018 रोजी सायं ५ वा.शानदाररित्या संपन्न झाला. पुढे डॉ धेंडे साहेब म्हणाले की पैशा भगवान नही है। लेकीन पैशा भगवान से कम नही है। या युक्तीने नोकरी करताना स्वयंकेंद्रीत काम न करता समाजाभिमुख काम करा तरच देशाचा आर्थिक विकास होईल.आर्थिक जमा खर्च विकास , आणि नियोजन हे प्रत्येकाने केले तर आपला देश नक्कीच महासत्ता बनेल असे देखील म्हंटले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक म्हणाले की 8 तासाची नोकरी करताना इतर छंद लक्षात घेऊन आपली प्रगती व आर्थिक नियोजन करून स्वतःचा विकास करा. सोबत समाजाचे देणे म्हणून नावलौकिक होईल असे काम व मार्गदर्शन करा. खेड्या पाड्यात राजकारणी मंडळी पेक्षा आपणास जास्त मान सन्मान मिळतो त्यामुळे प्रामाणिक पणे काम करा असा मौलिक सल्ला देखील दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना माजी एसबीआय अधिकारी व अँप्टी अँकॅडमी चे संचालक लोकेश शर्मा व जी के टुडे मासिकाचे लेखक डॉ पुष्पक पांडव यांनी चालु घडामोडी वर मार्गदर्शन करून बँकिंग क्षेत्रात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने खूप अभ्यास करा यश निश्चित मिळेल असे म्हणाले.
या प्रसंगी सत्कार्थी विद्यार्थ्यांनसह 260 विद्यार्त्याना बॅग व “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी डॉ.धेंडे आणि शर्मा यांचे शुभहस्ते मंचावरील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली तर पाहुण्याचा सत्कार फुले दांपत्य प्रतिमा ,शाल ,श्रीपळ भेट देऊन केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ महाडीक यांनी केले तर अभारप्रदर्शन अमेय तरवटे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच आकाश ढोक, क्षितिज ढोक यांनी केले