पुणे… क्विक हिल फाउंडेशनने डॉ. वसंत दादा पाटील हायस्कूल, पुणे येथे एका संवाद सत्राचे आयोजन केले. या कार्यक्रमाला पुणे महानगर पालिकेचे शिक्षण अधिकारी श्री. माळी आणि क्विक हिल टेक्नोलॉजीस लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. कैलाश काटकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या सत्रात इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशन आणि पंख फाउंडेशनच्या ‘शाळांगण’ च्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या मार्गदर्शन सत्रात आलेल्या अनुभवांचे कथन केले. या मार्गदर्शनपर सत्रांदरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. त्यावेळी पौगंडावस्थेतील वर्तणूक समस्या, कौटुंबिक समस्या, व्यसन, अभ्यासातील अडचणी, लैंगिक शिक्षण, एचआयव्ही आणि एड्स जागरुकता, बाल आणि लैंगिक गैरवर्तनासंबंधीचे शिक्षण इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना क्विक हिल टेक्नोलॉजीस लिमिटेडचे एमडी आणि सीईओ म्हणाले की; “चांगल्या प्रकारचे शिक्षण पुरवण्याव्यतिरिक्त मुलांना, प्रामुख्याने पौगंडावस्थेतील नवयुवकांना शिक्षणात लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने पालक व शिक्षकांना साह्य करणे ही आमची बांधिलकी आहे. हे वय फारच आडनिडे असून त्यावरच व्यक्तीचे भविष्य अवलंबून असते.” ते पुढे म्हणाले की; “आमच्या मार्गदर्शनपर सत्रांमध्ये आम्ही मुलांच्या आयुष्यातील आडनिड्या वयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरात सशक्त वातावरण नाही, अशा विद्यार्थ्यांना आमचे सल्लागार विपरीत परिस्थितीशी मुकाबला करण्याची साह्य पुरवतात.”
आपला अनुभव सांगताना 10 वीचा एक विद्यार्थी म्हणाला की; “मी शाळांगणच्या मदतीने कौशल्य विकसित केली. त्यामुळे माझे कुटुंब आणि समाजासाठी एक जबाबदार व्यक्ती बनण्यास मला मदत झाली. यामुळे मला अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यास मदत झाली.”
आणखी एक 9 व्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी म्हणाला की; “ मी कौटुंबिक कलह आणि आर्थिक समस्यांमुळे उदासीन असे. मला या मार्गदर्शनपर सत्रामुळे माझ्या मानसिक विकृतीतून बाहेर पडण्यास मदत झाली. त्यामुळे घरातील परिस्थिती बदलण्याचा खंबीरपणा माझ्यात आला. त्याचबरोबर अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यासही हातभार लागला.”
‘शाळांगण’ या अंतर्गत ‘लाईफ स्कील ट्रेनिंग’ आणि ‘काउन्सिलिंग सेशन्स’ असे आणखी उपक्रम राबवण्यात आले. ‘लाईफ स्कील ट्रेनिंग’ कार्यक्रमातंर्गत क्विक हिलने पुण्यातील 27 महानगरपालिका शाळांमध्ये घेण्यात आले. 9 वीतल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्य रुजावीत हा या सत्रांचा उद्देश आहे. क्विक हिल फाउंडेशनने हा कार्यक्रम जून 2015 मध्ये सुरू केला. सप्टेंबर 2016 पर्यंत पुण्यातील 27 पीएमसी शाळांमधून हा उपक्रम सुमारे 6,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य पूर्ण व्हावे म्हणून 35 स्वयंसेवकानी क्विक हिल फाउंडेशन साह्य केले.
पौगंडावस्थेत नवयुवकांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल घडत असतात. त्यांच्या भावना आणि शिक्षणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला. काही मुलं समाजातील दुर्बल घटकातून येतात. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांना महत्त्वाचे विषय समजवून देण्याचे गांभीर्य नसते. या सत्रांमुळे आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यास विद्यार्थ्यांना साह्य मिळते आहे. त्यामुळे वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर लक्ष विचलित होण्यापासून ते परावृत्त होऊ शकतात.
क्विक हिल फाऊंडेशनबाबत ….
क्विक हिल फाऊंडेशन ही क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीची स्वतंत्र शाखा असून तिची स्थापना 2014 च्या ऑगस्ट महिन्यात करण्यात आली. कंपनी अधिनियमांतर्गत या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून या संस्थेच्या कामकाजावर क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या संचालक मंडळाचे नियंत्रण आहे. क्विक हिल फाऊंडेशनतर्फे संपूर्ण भारतात सामुहिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच, या संस्थेचे कार्य पर्यावरण, शिक्षण आणि सायबर जनजागृती या विषयांभोवती गुंतलेले आहे. समाजाचे देणे फेडण्यासाठी व आपली सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ही संस्था अनेक सामाजिक संस्थांसोबत मिळून काम करते.
क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेडविषयी थोडेसे…
क्विक हिल टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी सॉफ्टवेअर सुरक्षा उत्पादने पुरविणारी भारतातील अग्रेसर कंपनी आहे. पुणे शहरात नोंदणीकृत कार्यालय असलेली ही कंपनी 1995 मध्ये स्थापन करण्यात आली. 30 जून 2016 रोजी केलेल्या नोंदीनुसार, क्विक हिल कंपनीचे भारतात 1 हजार 300 कर्मचारी असून या कंपनीचे 20 हजार चॅनेल भागीदारांचे जाळे आहे. एकूण 64 कार्यालयांमध्ये कंपनीतर्फे विक्री आणि विपणन उपक्रम राबविले जातात तसेच, भारतात एकूण 36 शहरांमध्ये या कंपनीची गोदामे आहेत. जपान, दुबई, अमेरिकन संयुक्त राष्ट्रे आणि केनिया या देशांत या कंपनीची सहाय्यक कार्यालये आहेत.
क्विक हिलच्या पोर्टफोलिओमध्ये विविध ऑपरेटींग सिस्टम आणि डिव्हाईसमध्ये उपयुक्त असणारी ´क्विक हिल´ आणि ´सेक्राईट´ ही दोन सॉफ्टवेअर सुरक्षा उत्पादने येतात. कंपनीच्या स्थापनेपासून क्विक हिलची 24.5 कोटी लायसन्स इन्स्टॉल करण्यात आली असून 30 जून 2016 च्या नोंदणीनुसार जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये 7.3 कोटी लायसन्स कार्यान्वित आहेत.