पुणेकरांनो, तुमचा मिळकतकर तपासून घ्या-मिळकतकरप्रमुख अजित देशमुख यांचे आवाहन

Date:

पुणे – महापालिकेकडून नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या मिळकतकराच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सर्व वॉर्डांतील मिळकतींचे वार्षिक करपात्र मूल्य दर्शविणारे ‘आकारणी पुस्तक’आणि संगणकीय आकारणी नोंदणीची माहिती पुणेकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.पुणेकरांना कर आकारणी नोंदी नागरिकांना महिनाभर पाहता येणार असून जागुत पुणेकर आणि कादात्यांनी हे तपासून घ्यावे असे आवाहन मिळकतकर प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे.नागरिकंना ही माहीती पाहिल्यानंतर चूकीची नोंद अथवा कर आकारणी झालेली असल्यास कर आकारणी आणि संकलन विभागाकडे 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कर आकारणी विभागात तक्रार करता येणार आहे. तर प्रत्येक मिळकतीसाठी स्वतंत्र तक्रार अर्ज करणे आवश्‍यक असण्यासह मिळकतीच्या मालकानेच तक्रार करणे बंधनकारक असणार आहे. असेही ते म्हणाले.

ते म्हणाले,’येत्या 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागात पाहता येणार आहेत. त्यामुळे, महापालिकेकडून 2022-23 या आर्थिक वर्षात पाठविलेली बिले या आकारणीनुसारच झालेली आहेत का याची तपासणी करून त्याबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांना लेखी तक्रारीही करता येणार आहेत.

महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना संबधित आर्थिक वर्षांची मिळकतकराची बिले दिली जातात. ही कर आकारणी करताना महापालिकेकडून निश्‍चित केलेल्या करपात्र मूल्यानुसार आणि मिळकतीच्या आकारवर कर आकारणी केली जाते. हे कर आकारणीचे बिल महापालिका मिळकतधारकास 31 मार्चच्या आधीच पाठवून देते. त्यामुळे, नागरिकांना 1 एप्रिल पासूनच कराची रक्कम भरणे सोयीचे जाते. मात्र, अनेकदा नागरिकांना कर आकारणी कशी केली आहे.

दर योग्य पध्दतीने तसेच आपल्या भागातील मिळकतींच्या प्रमाणे आहेत का याची माहिती नसते, त्यामुळे अनेकजण गोंधळून जातात, तसेच चूकीचा कर असला तरी भरतात, काही जण तक्रार करतात त्यानंतर समाधान होत नाही तो पर्यंत मिळकतकर भरत नाहीत. त्यामुळे, कर रकमेची थकबाकीही वाढते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीनुसार, महापालिका दरवर्षी नागरिकांना शहरातील सर्व वॉर्डांतील मिळकतींचे वार्षिक करपात्र मूल्य दर्शविणारे “आकारणी पुस्तक’ पाहण्यासाठी उपलब्ध करून देते.

दरम्यान, नागरिकंना ही माहीती पाहिल्यानंतर चूकीची नोंद अथवा कर आकारणी झालेली असल्यास कर आकारणी आणि संकलन विभागाकडे 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कर आकारणी विभागात तक्रार करता येणार आहे. तर प्रत्येक मिळकतीसाठी स्वतंत्र तक्रार अर्ज करणे आवश्‍यक असण्यासह मिळकतीच्या मालकानेच तक्रार करणे बंधनकारक असणार असल्याचे अजित देशमुख यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....