Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत डेमू धावण्याची शक्यता

Date:

पुणे:
पुणे-दौंड व दौंड-पुणे दरम्यान डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) रेल्वेची यशस्वी चाचणी मंगळवारी (दि. 17) करण्यात आली. मंगळवारी सकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी या 10 डबे असलेल्या डेमू रेल्वेने पुणे स्थानक सोडले व दौंडला 9 वाजून 50 मिनिटांनी ती पोहोचली. परतीच्या प्रवासात सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी तिने दौंड स्थानक सोडले व दुपारी 12.15 वाजता ती पुणे रेल्वे स्थानकात पोहोचली.

अनेक तांत्रिक बाबी या चाचणीदरम्यान तपासण्यात आल्या. फलाटांची उंची, रेल्वे किती वेळ स्थानकात थांबविण्यात यावी, प्रवाशांना रेल्वेचा जिना चढ-उतार करण्यास येणार्‍या अडचणी, आदी बाबी या चाचणीदरम्यान तपासण्यात आल्या. दरम्यान, डेमूची चाचणी यशस्वी झाल्यामुळे ती फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला याच्या 12 फेर्‍या (पुणे-दौंड 6 व दौंड-पुणे 6) सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती असून याचा तिकिटदर उपनगरी गाड्यांप्रमाणेच (लोकलचा दर) असणार आहे. चढ-उतार करण्यास जिने असल्यामुळे थेऊर, कुंजीरवाडी, मांजरी, मुंढवा, भारत फोर्ज, मगरपट्टा सिटी, अशा लहान स्थानकांवर देखील ही रेल्वे थांबविण्यात येवू शकते.
विद्युतीकरणानंतरही डेमूच धावणार ?
पुणे-दौंड दरम्यान विद्युतीकरण होऊन तब्बल चार महिने उलटले आहेत. या मार्गावर लोकल (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) धावू शकेल, या हेतूने लाखो रुपये खर्च करुन विद्युतीकरण करण्यात आले. मात्र तरीदेखील तांत्रिक कारण दाखवून डिझेलवर धावणारी डेमू रेल्वेच या मार्गावर धावण्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

डेमू रेल्वे केवळ पुणे-दौंड मार्गावर न सोडता ती खंडाळा ते दौंड मार्गावर सोडण्यात यावी. म्हणजे दीडशे किलोमीटर अंतरावरील या पट्ट्यातील लोकांना याचा लाभ घेता येईल. आणखी विलंब न करता ती लवकरात लवकर सुरु करण्यात यावी.

-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...