पुणे -महापालिकेच्या प्रभाग क्र. 75 मधील कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजीत कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मधे प्रवेश केला. याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर उपस्थित होते. कदम यांनी स्थायी समितिमधे काम पाहिले आहे. कदम यांच्या प्रवेशामुळे कात्रज - आंबेगाव परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे असा दावा भाजपतील काही तथाकथित नेत्यांकडून केला जातो आहे . कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमधे आलेल्या विद्यमान नगरसेवकांची संख्या 6 वर पोहचली असून येत्या काही दिवसात आणखी काही नगरसेवक भाजपमधे प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजीत कदम भाजप मधे
Date: