पुणे- मुंढवा परिसरात शुक्रवारी रात्री पोलिसांनी कपिला मॅट्रिक्स या हाय प्रोफाइल जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी काही पोलीस अधिकारीच जुगार खेळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्हातील पोलीस दलात मोठी चर्चा होते आहे.जलसंपदा मधील मुंडे ,पीएमपीएमएल चे मुंडे गाजत असताना पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने ,या कारवाई बद्दल मुंडे यांना शाब्बासकी मिळत आहे .तर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना दक्षिण पुण्यातील म्हणजे धनकवडी ,कात्रज परिसरातील तसेच सिंहगड रोड वरील वडगाव धायरी परिसरातील मटका अड्डे, बेकायदा दारू धंदे ,गॅस सिलेंडरचे काळे धंदे या कडे लक्ष पुरवा असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे .तर पोलीस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांना हि याबाबत साकडे घालण्यात येत आहे . मटका -जुगार अड्ड्यावरील लोकांची दादागिरी, आपसातील मारामाऱ्या देखील वाढल्या आहेत.
दरम्यान मुंढवा येथील माजी नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव विजय जाधव असे असून ते बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि त्यांच्या पथकाने केली.
मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह ४१ जणांना पोलीसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरून ७ लाखांची रोकड, ४ चार चाकी आणि दुचाकी वाहने, टीव्ही असा जवळपास १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे