Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभा बेकायदा – आमदार सुनील कांबळेंचा विधानसभेत महापालिका प्रशासकावर प्रहार (व्हिडिओ )

Date:

आमदार भिमराव तापकीर म्हणाले , आपण ठेकेदारांना पाठीशी घालता ..लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची साधी दखल घेत नाहीत … तापकीर,कांबळे आणि वर्षा गायकवाड यांनी सभागृहात उठविला आवाज

विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेऊन ६/७ महिने प्रशासक बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप

नागपूर, दि. 23 : पुणे महापालिकेचे प्रशासन प्रशासकीय राजवट आल्या पासून घेत असलेल्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभा या बेकायदेशीर पद्धतीने घेत असल्याचा आरोप आज विधानसभेत आमदार सुनील कांबळे यांनी केला . आमदार भीमराव तापकीर यांनी महापालिकेच्या संदर्भात ३ प्रश्न उपस्थित केले . लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची, मागण्यांची दखल घेऊन त्यांना उत्तरदायी असलेले पोर्टल सुरु करणार काय ?मैलापाणी शुद्धीकरण प्रकरणी ठेकेदाराच्या चुकीच्या कामाला आपण पाठीशी घालताय ? आणि २४ तास समान पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण होणार ? असे तीन प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या शिवाय नागरिकांना उत्तरे देणाऱ्या पोर्टल प्रमाणे लोकप्रतिनिधींच्या तक्रारींना देखील उत्तरे दिली पाह्जेत असे ते म्हणाले. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात पुणे महापालिके बरोबर सर्वच महापालिकांच्या संबधितांना लोकप्रतिनिधींना उत्तरदायी असल्याची जाणीव पुन्हा पुन्हा करून का द्यावी लागते असे विचारले. तर आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका प्रशासक कायदे नियम धाब्यावर बसवून मुख्य सभा आणि स्थायी समितीच्या सभा घेत असल्याचा आरोप करून,विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेऊन ६/७ महिने प्रशासक बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप करत त्यावर कारवाईची मागणी केली

यावर मंत्री उदय सामंत यांनी सांगितले कि,पुणे महापालिकेवर १५ मार्च २२ ला प्रशासक नेमण्यात आला ,त्यांनी ८२ मुख्य सभा आणि ४२ स्थायी समितीच्या सभा घेतल्या . पानिपुअरवथ प्रकल्पातील २०१६ पासून ८२ पैकी केवळ ४२ टाक्या बाधून झाल्यात,२२ टाक्यांचे काम प्रगतीपथावर आहे, .मार्च २०२३ पर्यंत हे पूर्ण काम होईल.मुळा मुठा नदी सुधारणेसाठी ११ एसटीपी बंधने ,संपूर्ण राष्ट्रीय नदी संवर्धन मधून १३५० कोटी मंजूर झालेत , १५७.८६ कोटी यावर आतापर्यंत खर्च झालेत ,मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल .चुकीचे काम प्रशासकीय राजवटीत झाले असेल तर त्याचे समर्थन आम्ही करत नाही सभासदांनी उपस्थित केलेल्या या तक्रारीबाबत त्याची माहिती घेऊ .

पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण
प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य उदय सामंत

पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत कामे सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य भीमराव तापकीर , सुनील कांबळे यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.
ते म्हणाले की, पुणे शहर हे भौगोलिकदृष्ट्या उंच व सखल भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जादा दाबाने व जादा वेळेसाठी पाणी उपलब्ध आहे व काही भागामध्ये अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याअनुषंगाने पुणे शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना २४x७ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचे पुनरूत्थान करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर एएमआर मीटर्स बसविणे आदी बाबींचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प राबविण्याकरीता पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरीता एक निविदा, मुख्य दाब नलिका टाकण्याकरीता एक निविदा व शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या निविदांपैकी पाण्याच्या ८२ साठवण टाक्यांपैकी आज अखेर ४२ टाक्यांची कामे पूर्ण झालेली असून २२ टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून, टप्प्याटप्प्याने माहे सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
याशिवाय, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे बांधणे (एकूण क्षमता ३९६ एम.एल.डी.) व ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकणे प्रस्तावित आहेत. या ११ मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी नायडू हॉस्पिटल (१२७ एम.एल.डी.), भैरोबा (७५ एम.एल.डी.), धानोरी (३३ एम.एल.डी.), वडगाव (२६ एम.एल.डी.) या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची कामे जागेवर सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम विहित मुदतीत मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पठारे यांची मागणी.. पुणे...

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 - मागेल त्याला सौर...