पुणे महानगरपालिकेचे मदतपथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पीएमपीएमएलच्या बसेसमधून रवाना

Date:

पुणे- अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील पूर आता ओसरत असून परिसरामध्ये रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असून याकामी पुणे महानगरपालिकेकडून मनुष्यबळ व उपकरणे पाठवण्यात आली. या मदत कार्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून ६० लोकांचे मदतपथक कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. या मदतपथकाला कोल्हापूर येथे जाणे व येणेसाठी पीएमपीएमएल कडून २ मिडी बसेस २ चालक व २ मेकॅनिकसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवश्यक त्या परवानगीसह पीएमपीएमएल कडून २ मिडी बसेस पुणे महानगरपालिकेला मदत कार्यासाठी देण्यात आल्या आहेत.सदरच्या २ मिडी बसेस पुणे महानगरपालिकेला तातडीने आवश्यक त्या पुर्ततेसह उपलब्ध करून देण्याबाबत पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांनी पीएमपीएमएल च्या अधिकाऱ्यांना सूचित केले होते. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या परवानगी
व पुर्ततेसह या बसेस उपलब्ध करून दिल्या. पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी.अजितकुमार शिंदे यांनी आवश्यक ती परवानगी तातडीने देऊन मोलाचे सहकार्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई, दि....

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...