‘पुणे फेस्टिव्हल’चे प्रमुख आकर्षण शर्मिला टागोर ,संजय खान ……

Date:

पुणे :
पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमांना दि. ६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून, यावर्षी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. दिग्विजयसिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राहुल बजाज ,उद्योगपती, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पालकमंत्री (पुणे जिल्हा) गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ सप्टेंबर रोजी उदघाटन सोहळा होणार आहे.
 यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मूकारी अलगुडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. के. एच. गोविंदाराज (व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संजय खान, शेखर सुमन, सुरज पांचोली, नेहा  पेंडसे, मल्लिका शेरावत, पुजा हेगडे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘पुणे फेस्टिव्हल’चे संस्थापक,अध्यक्ष  सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई, सुभाष सणस, पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, श्रीरंग गोडबोले, सुप्रिया ताम्हाणे, दीपाली पांढरे, प्रसन्न गोखले, अनुराधा भारती इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ‘फेस्टिव्हल्स’ची जननी मानल्या जाणार्‍या या ‘पुणे फेस्टिव्हल’ चे हे २८ वे वर्ष आहे. दि . ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार्‍या ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये अनेक रंगारंग,वैविध्यपूर्ण  कार्यक्रमांचा समावेश आहे.
   ‘ पुणे फेस्टिव्हल  कमिटी ‘, पुणेकर नागरिक , भारत सरकारचा पर्यटन विभाग , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,यांच्या सहकार्याने ‘पुणे फेस्टिवल २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘पुणे फेस्टिव्हल’च्या ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’ नेहरू स्टेडियमच्या ‘सारस हॉल’मध्ये ५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता  होणार आहे. यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अनुजा साठे उपस्थित राहणार आहेत.
       ६ सप्टेंबरपासून फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होत असून, फेस्टिव्हलचा उदघाटन सोहळा ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे.
    यावर्षीचा ‘पुणे फेस्टिव्हल  पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना या  सोहळ्यात देण्यात येणार आहे .
उदघाटन सोहळ्यात तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे, प्रचिती डांगे ‘कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी’ नृत्य यांचा संगम असलेली गणेश वंदना सादर करणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रम, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त गौरव गीत सादर केले जाणार आहे. ‘कलरफुल लावणी’ या कार्यक्रमाची संकल्पना व नृ कात्य दिग्दर्शन  निकिता मोघे यांचे असून यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले,अनुजा साठे, तेजस्विनी लोणारी,गिरीजा जोशी, सुशांत शेलार यांचा  समावेश आहे. महाराष्ट्राच्या उत्सवांवरील ‘ फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र ‘ कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन संतोष संखद यांचे असून अनिकेत विश्‍वासराव, अभिजित केळकर ,स्मिता शेवाळे, तितिक्षा तावडे  यांचा यामध्ये  समावेश आहे.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश देशपांडे ,देविका नाडिग करणार आहेत .
‘उत्सव एक -अविष्कार अनेक’ असे बोधवाक्य असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, छायाचित्र  प्रदर्शन, नृत्य, गायन, ‘गणेश शरणम्’ कर्नाटकी शास्त्रीय संगीत नंदिनी राव -गुजर आणि सहकारी सादर करणार आहेत  अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
‘ऑल इंडिया उर्दू मुशायरा’, धनंजय दैठणकर -रामदास पळसुले -राजेंद्र कुलकर्णी यांची तबला-संतुर- बासरी यांची जुगलबंदी, अरुण काकतकर यांचा ‘नक्षत्रांचे दिवस’ हा कार्यक्रम, डॉ. गिरीश ओक -हेमांगी कवी यांची भूमिका असलेले ‘ती फुलराणी’ हे नाटक, ‘मराठी कवी संमेलन’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे करणार आहेत, ‘मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा’, एकपात्री कलाकारांचा ‘हास्योत्सव’, हिंदी सिनेमातील कपूर घराण्याच्या कार्य कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘कपूर्स डायरी’ कार्यक्रम, गजाननराव वाटवे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘गगनी उगवला सायंतारा’ या भावगीत गायनाचा कार्यक्रम, कर्नाटकी शास्त्रीय संगीत, ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ ही गायन स्पर्धा, ‘शिव -ओम ‘कथक बॅले यास्मिन सिंग ,रायपूर आणि सहकारी सादर करणार आहेत , ओडिसी नृत्य, मंगळागौर स्पर्धा, जुन्या -नव्या हिंदी गाण्यांचा ‘बॉलिवूड हंगामा’,लावणी महोत्सव, महिला कलाकारांच्या पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शन, ‘उगवते तारे’, ‘इंद्रधनू’, ‘केरळोत्सवम’असे  भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
शिवाय ‘कुस्ती’ स्पर्धा, ‘गोल्फ’, ‘रोल बॉल’ स्पर्धा, ‘चित्रकला’ स्पर्धा , ‘मेंदी -उखाणे -पाककला’ स्पर्धा असलेला ‘महिला महोत्सव’ अशी या वेळच्या ‘पुणे फेस्टिव्हल’ची वैशिष्ट्ये आहेत. मराठीच्या भाषा भगिनी असलेल्या मल्याळी, केरळी, कर्नाटकी, भाषेतील कार्यक्रमांचाही ‘पुणे फेस्टिव्हल’मध्ये समावेश आहे. ‘झी मराठी’चा ‘गणा धाव रे ‘ , ‘झी टॉकीज’चा याड लागलाय , ‘झी क्लासिक’ या वाहिन्यांचे कार्यक्रमही या वर्षीचे वैशिष्ट्य आहे. हे कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील.
 ‘पुणे फेस्टिवल २०१६’चे मुख्य प्रायोजक झी मराठी’,झी टॉकीज,झी क्लासिक हे आहेत. सहप्रायोजक नेक्सा , जमनालाल बजाज फौंडेशन आहेत, तर असोसिएट प्रायोजक ऍडव्हीक हाय टेक प्रायव्हेट लिमिटेड , भारत फोर्ज , येस बँक ,पंचशील, नॅशनल एग को -ऑर्डिनेशन कमिटी आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....