Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जगभरात गणेश फेस्टीव्हल साजरा होण्यात कलमाडींच्या पुणे फेस्टिव्हलचेही श्रेय – हेमामालिनी

Date:

पुणे – आखाती देशात बॅलेचे कार्यक्रम करताना आम्हा कलाकारांना डोक्यावर मुकुट घालून देण्यात आलेला नव्हता. त्याच आखाती देशांसह जगात अनेक देशात आज गणेशोत्सव साजरा कऱण्यात येत आहे. या गणेशोत्सवाची दुबईमध्ये सुरू असलेली तयारी बघून मलाच धक्का बसला. आज जगभरात गणेशोत्सव साजरा केला जात असून हा उत्सव जगभर पोचवण्यात पुणे फेस्टिव्हल व सुरेश कलमाडींचाही सहभाग आहे असे गौरवोदगार खासदार अभिनेक्षी हेमामालिनी यांनी आज येथे काढले. दरम्यान, गेल्या 30 वर्षात 27 वेळा आपण या रंगमंचावरून कलाविष्कार सादर केला असून पुढील वर्षी आपण या मंचावर शंभर टक्के कलाविष्कार सादर करणार अशा शब्दात हेमामालिनी यांनी पुणेकर रसिकांना आश्वस्त केले.

३०व्या पुणे फेस्टीव्हलचे उदघाटन अभिनेत्री, नृत्यांगना खासदार हेमामालिनी यांनी  श्री गणेश कला क्रिडा रंगमंच येथे दीप प्रज्वलन करून आणि श्री गणेशाची मंगलमाल आरती करून केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. वेदमूर्ती धनंजय घाटे यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,  जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपीन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे, अभिनेत वरूण शर्मा यांसह पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी,  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि सुभाष सणस आदी रंगमंचावर उपस्थित होते. तसेच आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार उल्हासदादा  पवार, माजी आमदार मोहन जोशी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते. प्रेक्षागृह रसिकांनी तुबुंड भरले होते.

या उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना हेमामालिनी यांच्याहस्ते तर  बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते पुणे फेस्टीव्हल ऑवॉर्डने सन्मानीत करण्यात आले. परंपरेनुसार यंदा शताब्दी वर्ष साजरे करणा-या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर (गणेशोत्सव मंडळ) चा विशेष सन्मान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर आणि सहका-यांनी स्वीकारला.

गेली २७ वर्षे आपण या पुणे फेस्टीव्हलमध्ये कलाविष्कार सादर करत आहोत याचा अभिमान आहे असे सांगून हेमामालिनी म्हणाल्या, मी फक्त अभिनेत्री असते तर हे शक्य झाले नसते. परंतु मी अभिनेत्री बरोबरच एक कलाकारही आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये कलाविष्कार सादर करण्याला फार महत्व दिले जात असल्यानेच आपण या फेस्टीव्हलमध्ये नवेनवे बॅले सादर करू शकलो. नुकतेच दुबईमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता तेथे सुरू असलेली गणेशोत्सवाची तयार बघूनच मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुमारे १० – १५ वर्षापूर्वी आबुधाबीत मला दुर्गा बॅले सादर करताना कोणीही देवतांनी मुकुट घालायचे नाहीत असे सांगण्यात आले होते. त्यानंतर देवदेवतांचे बॅले तेथे कधीच केले नाहीत. आज त्याच आखाती देशात देवतांची मंदीर बांधली जात आहेत. गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जसे आहे तसे गणपतीचा उत्सव साजरा होण्याचे काही श्रेय कलमाडींच्या पुणे फेस्टीव्हललाही आहे. आज महाराष्ट्रात जसा दहा दिवस गणेशोत्सव घरोघर साजरा केला जातो तसाच सर्वच राज्यात तो घऱोघरी साजरा केला जात आहे.

पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले,  आज गणेशोत्सवाचे जे चांगले स्वरूप होत चालले आहे. गणेशोत्सवाचे चांगले स्वरूप होण्याला गेली ३० वर्षे सातत्याने आयोजित होणारा पुणे फेस्टीव्हलही कारणीभूत असल्याने या फेस्टीव्हलसाठी सरकार सर्व सहाकार्य मदत करत आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गेली 30 वर्षे पुणे फेस्टिव्हलला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल पुणेकर रसिकांचे “थँक्यू पुणे” अशा शब्दात आभार मानले. ते म्हणाले,  सन 1989 साली शहरात धार्मिक, जातीय सलोखा टिकून रहावा आणि पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर न्यावे या उद्देशाने पुणे फेस्टीव्हल सुरू करण्यात आला होता. तो 30 वर्षे अखंडपणे सुरू राहिला याचे श्रेय्य पुणेकरांनाच आहे.यावेळी हर्षवर्धन पाटील, सुहास दिवसे, विजय शिवतारे, दिलीप कांबळे यांची भाषणे झाली.

पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या मंगलमय सनई वादनाने झाला. त्यानंतर प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी सहका-यांसह गणेशवंदना सादर केली. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना जय जयकार करा….., सेतू बांधा रे…… आणि वंद्य आम्हा वंद्य वंदे मातरम……या त्यांच्या अजरामर गीतातून ‘स्वरांजली’ भाग्यश्री अभ्यंकर, सोनाली नांदुरकर, ऋषिकेश बडवे आणि हेमंत वाळुंजकर यांनी अर्पण केली. याचे संयोजन प्रकाश भोंडे यांनी केले होते. योगाचे महत्व सांगण्यासाठी महाराष्ट्र मंडळाच्या 15 मुला –  मुलींनी आकर्षक योगा प्रात्यक्षिके करून दाखवली, त्यांच्या प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे आहेत. पोवाड्यातून रजनीश कलावंत आणि कोरिओग्राफर तेजश्री अडिगे यांच्यासह १८ महिला कलावंतानी स्त्री शक्तीचा जागर केला. होळी धुलीवंदन नृत्य,  पंजाबी भांगडा, गुजराती गरबा नृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य व नारळी पौर्णिमा यांचा समावेश असलेला नृत्याविष्कार गाण्यांसह ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया’ व्दारे दाखवण्यात आला. याचे नृत्य दिग्दर्शन प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण,  नृत्यदिग्दर्शक कुणाल फडके व शिल्पा जोशी यांनी केले होते. ‘डान्स मंत्रा ग्रुप’च्या  11 मुले, 11 मुली आणि ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या 7 मुलींनी हा नृत्याविष्कार सादर केला.

उदघाटन सोहळण्याची सांगता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ट्रीब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंडस्’ या विशेष नृत्य व संगीताच्या कार्यक्रमाने झाली. त्यामध्ये नृत्यांगना अभिनेत्री   प्रिया मराठे,  चेतन चावडा आणि मयुरेश पेमसह पुणे फेस्टिव्हलच्या सुमारे 25 कलावंतांनी नृत्याविष्कार सादर केले. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफार तेजीश्री अडिगे यांनी केले आहे. या उदद्घाटन सोहळ्याचे मराठीतून योगेश देशपांडे व इंग्रजीतून दूरिया शीपचांडलर सूत्रसंचालन केले.  पुणे फेस्टिव्हलचे प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जमनालाल बजाज फाउंडेशन, भारत फोर्ज,  येस बँक,  एनईसीसी, एलआयसी, पंचशील व कोहिनूर ग्रुप हे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...