पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये बाल किर्तनकारांनी निरूपण करत सादर केलेल्या किर्तनातील विविध प्रकारांनी अवघे वातावरण भक्तिमय झाले. आपल्या ओघवत्या वाणीने या बाल किर्तनकारांनी रसिकांना तृप्त केले.
पुणे फेस्टिव्हल मध्ये यंदा प्रथमच बालगंधर्व रंगमंदिर येथे नारदीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी नम्रताताई मेहेंदळे यांच्या हस्ते हभप ताराबाई राजाराम देशपांडे व नंदकुमार मेहेंदळे यांच्या हस्ते हभप श्रीरामचंद्रबुवा बोर्हे यांचा सन्मान करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे डॉ. सतिश देसाई, तारका फौंडेशनचे अध्य्क् आशिष कांटे, मोहन टिल्लू, फेस्टिवलचे बालगंधर्व रंगमंदिराचे प्रमुख श्रीकांत कांबळे हे यावेळी उपस्थित होते. डॉ. सतीश देसाई व आशिष कांटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हभप रामचंद्र भिडे , हभप नचिकेत मेहेंदळे, हभप तन्मयी मेहेंदळे या कलाकारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राची सांस्कृतिक-धार्मिक परंपरा असणार्या कीर्तन परंपरेतील विविध प्रकार यावेळी १२ कीर्तनकार व ५ साथ संगतकारांनी यावेळी सादर केले. सामुदायीक कीर्तन, सहयोगी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, चक्री कीर्तन, युगल कीर्तन-जोड आख्यान आदी कीर्तन प्रकारांचा यात समावेश होता. याप्रसंगी ह.भ.प. कीर्तनकलानिधी रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (निरूपणकार), ह.भ.प. नम्रता मेहेंदळे, ह.भ.प. ओवी काळे, ह.भ.प. आनंदी कर्हाडकर, ह.भ.प. पियुष कुलकर्णी, ह.भ.प. वर्धन बुरसे, ह.भ.प. तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. धनदा गदगकर, ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर,ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी, ह.भ.प. नंदकुमार मेहेंदळे, ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे आदी कीर्तनकार व कलाकारांनी यात सहभाग घेतला. याचबरोबर वादक संगीतकार म्हणून रेशीम खेडकर – पायपेटी,सुखदा जोशी – संवादिणी,नचिकेत मेहेंदळे – तबला, मयूर गुजर – तबला, ईशान मेहेंदळे – झांज यांनी साथसंगत केली.
यावेळी कीर्तन परंपरेप्रमाणे सर्वांचे कपाळावर बुक्का लावून व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. या महोत्सवाला रसिकांनी गर्दी केली होती.
हभप निवेदिता मेहेंदळे यांनी स्वागत केले व आभार मानले.