पुणे- पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीतील नगरसेवकावर गोळ्या झाडून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला .न्यू मोदीखाना रोड सुरांना इलेक्ट्रिकल या दुकानासमोर उत्सव संवर्धक गणपती मंडळाची मिरवणूक आली असताना . कँटोन्मेट बोर्डचे भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर दोघांनी गोळीबार केला.नगरसेवक विवेक यादव यांच्या तोंडाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत.या नगरसेवकाचा भाऊ चेतन यादव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून लष्कर पोलिसांनी याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . बाबल्या गवळी , दीपक गवळी,मोहन गवळी ,आशिष गवळी ,सागर गवळी, प्रतिक गवळी, सचिन गवळी ,कपिल सावंत, नितीन गवळी,आशिष भाकरे , राहुल भिसे आणि रामटेकडी येथे राहणारा विशाल नामक तरुण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सन२०१४ मध्य या गवळी यांची आणि चेतन यादव यांची भांडणे झाली होती . या प्रकरणी पोलीस अधिकारी जी आर भापकर अधिक तपास करीत आहे .