पुणे-पर्वती परिसरात पोलीस चौकीजवळच झालेल्या जळीतकंडात टेम्पो, दुचाकी व सायकल अशी एकूण 27 वाहने जाळून खाक झाली. ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळ स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. या आगीत 1 टेम्पो, 24 दुचाकी व 2 सायकल जाळून खाक झाले.
पुण्यात आशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. रात्रीची घटना ही पोलीस चौकीजवळच घडल्याने याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुण्यातील जनता वसाहतमध्ये मोकळ्या जागेत हि वाहने लावण्यात आलेली होती . यामध्ये टेम्पो, दुचाकी व सायकलींचा समावेश आहे. या घटनेचा तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता वसाहत गल्ली क्र. ३८ येथील पोलीस चौकी शेजारील शौचालयाच्या बाजूस मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी येथील रहिवासी आपली वाहने लावतात. रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तेथील एक टेम्पो, २४ दुचाकी आणि दोन सायकली आगीत जळून खाक झाली. आग कशामुळे लागली की कोणी लावली हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील रस्ते लहान असून आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची एकच धावपळ झाली.