कबड्डीतील महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच

Date:

बारामती- विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे संघाने रायगड व मुंबई उपनगर यांच्यासह राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या गटात आगेकूच कायम राखली.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे संघाने नागपूर संघाचा ५२-१४ असा धुव्वा उडविला. मध्यंतराला ३६-५ अशी आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता. त्याचे श्रेय आम्रपाली गलांडे व अंकिता जगताप यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. मुंबई उपनगर संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई शहर संघाला ४८-३६ असे पराभूत केले.‌ त्यावेळी पूर्वार्धात त्यांनी २३ विरुद्ध १७ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. मुंबई उपनगर संघाकडून हरदीप कौर, याशिका पुजारी व प्रांजल पवार यांनी अष्टपैलू खेळ केला.‌ मुंबई शहर संघाकडून मेधा कदम व प्रतीक्षा तांडेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
रायगड संघाने अमरावती संघावर ३३-१९ अशी मात केली त्यावेळी पूर्वार्धात त्यांच्याकडे १८-१० अशी आघाडी होती. रायगड संघाच्या या विजयाचे श्रेय तेजा सकपाळ व रचना मात्रे यांच्याकडे द्यावे लागेल. अमरावती संघाकडून बरखा गेडाम व मंगला राऊत यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.‌
पुरुष गटात मुंबई शहर संघाने विजयी वाटचाल कायम राखताना धुळे संघावर ४६-१६ असा दणदणीत विजय नोंदविला त्यावेळी मध्यंतराला त्यांनी ३१-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मुंबई शहर संघाच्या या विजयात सुशांत नाईक व मयूर शिवतीर्थकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. धुळे संघाकडून दिनेश अहिरराव याची लढत एकाकी ठरली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती

‘लेक शिकली, प्रगती झाली’ ही केवळ एक म्हण नाही,...

जाहिरात माफियांच्या दबावापुढे नमले,होर्डींग्ज धोरण मागे घेतले

आपल्या जाहिरात व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही जाहिरात माफियांनी...

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...