पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या पदवीधरांसाठीच्या संकल्प पत्राचे प्रकाशन आज महाराष्ट्राचे माजी मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते झाले. आठ संकल्पांचे आठची गाठ हे संकल्प पत्र प्रकाशित करताना हे सर्व संकल्प वास्तवात आणण्यासाठी श्री संग्राम संपतराव देशमुख हे कटिबद्ध राहतील अशी ग्वाही यावेळी गिरीश महाजन यांनी दिली.यावेळी पुणे शहर संघटन सरचिटणीस व पदवीधर निवडणुकीचे प्रमुख राजेश पांडे, पुणे प्रभारी गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे ,दीपक पोटे, राजेश येनपुरे,युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशील मेंगडे श्री योगेश बाचल इ. मान्यवर उपस्थित होते.