जनसंपर्क कार्यालये चळवळीची केंद्रे व्हायला हवीत-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Date:

पुणे : जनसंपर्क कार्यालय सुरु करणे सोपे आहे. परंतु सदासर्वदा सुरु ठेवणे तितकेच अवघड आहे. माणसांसाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर माणसांचा कंटाळा येता कामा नये. या कार्यालयामधून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत. त्यासाठी सतत पाठपुरावा केला पाहिजे. हे सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे करायला हवे. जनसंपर्क कार्यालये हि चळवळीची केंद्रे व्हायला हवीत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजप शिवाजीनगर भागाचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन दीप बंगला चौक, कॅनाल रस्ता येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप पुणेचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दत्ता खाडे, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, गणेश घोष, रविंद्र साळेगावकर यावेळी उपस्थित होते. 
चंद्रकांत पाटील म्हणाले, अनेक वर्षे सातत्याने भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. ते सतत पक्षाचा विचार करुन काम करीत असतात. भाजप हा जिवंत कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला गेला पाहिजे. चुकीच्या गोष्टी थांबविण्यासाठी संघर्ष व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. 
रविंद्र साळेगावकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करीत असल्याने लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा नेहमीच मिळते. लोकांची सेवा करणारे लोक संघात आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवाजीनगर भागातील लोकांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येणार आहे. याशिवाय ऑनलाइन तक्रार निवारण अॅप देखील तयार करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला..6500 कुटुंबांना नोकरीचीही संधी!

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ , बाधितांना जमिनीचा मोबदला देण्यास...

कायदा तोडणाऱ्या मागण्या : राज ठाकरेंना समजवावे, अन्यथा गुन्हा दाखल करावा

पुणे: नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला जरूर जास्तीतजास्त शिक्षा व्हावी...

लक्ष्मीनगर मध्ये 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताने संतप्त खळबळ

पुणे : पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न...